गझल

गझल

''जीवन अंधारातच आहे''

दमादमाने जातच आहे
कंप तरी श्वासातच आहे

रोज उगवतो सूर्य तरीही
जीवन अंधारातच आहे

दुर्दैवाला शह देतो पण,
मला मिळाली मातच आहे

गळा जाहला रुद्ध तरीही
सुरेल मन हे गातच आहे

गझल: 

ना दिवाळी पाहिली या लक्तराने !!!

ना दिवाळी पाहिली या लक्तराने !!!
.
*

ज्ञान का वाढे कुणाचे दप्तराने,
ना फ़ुलासी गंध येणे अत्तराने!

*

थांबवा थोतांड भोंदू-दांभिकांचे,
का खरे मरतात कोणी पंचकाने?

*

गझल: 

मी एकटीच येथे!!!(गझल).

मी एकटीच येथे!!!(गझल).
.
*

श्वासात ना कुणाच्या ना स्पंदनात आहे,
मी एकटीच येथे माझ्या जगात आहे!

*

गोंजारले कितीदा माझ्याच मी चुकांना,
तो शाप पूर्वजांचा सलतो मनात आहे!

*

गझल: 

चेहरा दे कोणताही बाटतो का आरसा ? ...........

सोवळ्याचा सोस - पाळा पुर्वजांचा वारसा
चेहरा दे कोणताही -बाटतो का आरसा ?

मी भला माणूस होतो - राहिलो निस्संग मी
पत्थराच्या पास कोणी - ठेवतो का आरसा ?

हासती माझ्यावरी - ते - बोलती "वेडा" मला

गझल: 

ही घडी दे !!!

ही घडी दे !!!
.
*

चांदण्याचा दाहदायी ज्वर नको !
दे मिठी दे.......! आर्ततेचा स्वर नको !!

*

रोमरोमी स्पर्श चंदन-केवडा !
एक फ़ुंकर.......! मोतियांची सर नको !!

*

गझल: 

एक होऊ या क्षणी

एक होऊ या क्षणी, नंतर नको
या घडीला आणखी जर तर नको

कुंतलांचा दूर कर पडदा जरा
-तेवढेही यापुढे अंतर नको

मीलनाची शृंखला तोडू नको..
आपल्याला आज मध्यांतर नको

प्रश्न स्पर्शानेच करतो मी तुला

गझल: 

रात्र झाली फ़ार आता !!!

रात्र झाली फ़ार आता !!!
.
रात्र झाली फ़ार आता !
तार किंवा मार आता !!

दु:ख माझे राजवर्खी,
सौख्य खाई खार आता !

भौतिकाच्या भोगवाटा,
आकळेना सार आता !

आस खोटी सावल्यांची,
ऊन वाटे वार आता !

गझल: 

चुंबिण्या येऊ नको तू

संपलेला ध्यास आता
दोन उरले श्वास आता

मोडुनी त्रिज्या सुखाच्या
विश्व केले व्यास आता

स्वप्न ती देऊन गेली
सत्य भासे भास आता

जिंकुनी पैजा विजांच्या
सोसुदे मधुमास आता

गझल: 

Pages