ना दिवाळी पाहिली या लक्तराने !!!

ना दिवाळी पाहिली या लक्तराने !!!
.
*

ज्ञान का वाढे कुणाचे दप्तराने,
ना फ़ुलासी गंध येणे अत्तराने!

*

थांबवा थोतांड भोंदू-दांभिकांचे,
का खरे मरतात कोणी पंचकाने?

*

कुंभकर्णी वंश माझा हीच ख्याती,
का उडावी झोप एका ’दस्तकाने’ ?

*

माजलेली घूसखोरी आत्मघाती,
घेतली का दाद काही लष्कराने ?

*

पावणे ना देव कोणाही बळी दे,
गांव वेडा शेंदरी या ’पत्थराने’ !

*

भव्य होती रोषणाई त्या महाली,
ना दिवाळी पाहिली या लक्तराने !

*

-सुप्रिया (जोशी) जाधव.

गझल: 

प्रतिसाद

अहो...
पुन्हा तीच चूक...
मतल्यामध्ये दप्तराने, अत्तराने असे काफिये घेतलेत... आता ----त्तराने असेच चालायला नको का?
By the way, मतला आवडला..

आनंदयात्रीजी,
आपल्या रास्त सुचनेबरहुकूम गझल दुरुस्त करुन पुन्हा टाकतेय्...
मनःपुर्वक धन्यवाद !!

ना दिवाळी पाहिली या लक्तराने !!!

ज्ञान का वाढे कुणाचे दप्तराने,
भूषवावे रे मुकूटा मस्तकाने !!

थांबवा थोतांड भोंदू-दांभिकांचे,
का खरे मरतात कोणी पंचकाने?

भूल-थापांनी जरी फ़सले कुणीही,
ना फ़ुलाला गंध येणे अत्तराने!

कुंभकर्णी वंश माझा हीच ख्याती,
का उडावी झोप एका ’दस्तकाने’ ?

माजलेली घूसखोरी आत्मघाती,
घेतली का दाद काही लष्कराने ?

पावणे ना देव कोणाही बळी दे,
गांव वेडा शेंदरी या ’पत्थराने’ !

भव्य होती रोषणाई त्या महाली,
ना दिवाळी पाहिली या लक्तराने !

-सुप्रिया (जोशी) जाधव.

ज्ञान का वाढे कुणाचे दप्तराने,
भूषवावे रे मुकूटा मस्तकाने !!

ह्या दोनअओळीत ला अर्थ लागत नाही