ही घडी दे !!!
ही घडी दे !!!
.
*
चांदण्याचा दाहदायी ज्वर नको !
दे मिठी दे.......! आर्ततेचा स्वर नको !!
*
रोमरोमी स्पर्श चंदन-केवडा !
एक फ़ुंकर.......! मोतियांची सर नको !!
*
धुंद तू ही , धुंद शेजी मोगरा !
श्वास हळवे......! बोलण्याची भर नको !!
*
मीलनांती ना उरावी भिन्नता !!
एक रुपे..........! व्यर्थ मादी-नर नको !!
*
ध्रुवतारी स्थान सजणा स्पंदनी !
ही घडी दे........! कोणताही ’वर’ नको !!
*
-सुप्रिया (जोशी) जाधव.
गझल:
प्रतिसाद
आनंदयात्री
मंगळ, 02/11/2010 - 12:37
Permalink
सुंदर!!! पण एक छोटासा prob
सुंदर!!!
पण एक छोटासा prob झालाय.. काफिया -वर असा घेतला आहात!! आता ज्वर, स्वर नंतर सत्वर इ यायला हवेत!
supriya.jadhav7
मंगळ, 02/11/2010 - 15:58
Permalink
हो नं ! जोशात लिहून पोस्ट्
हो नं !
जोशात लिहून पोस्ट् केल्यावर लक्षात आले.
पुढील गझलेत दक्षता घेईन.
धन्यवाद 'आनंदयात्री'जी.
केदार पाटणकर
गुरु, 04/11/2010 - 11:01
Permalink
मीलनांती.. हा शेर खूप
मीलनांती..
हा शेर खूप आवडला.
वा !
supriya.jadhav7
गुरु, 04/11/2010 - 19:10
Permalink
केदारजी, शतशः
केदारजी,
शतशः धन्यवाद!!!
आपल्या "एक होऊ या क्षणी" यावरुनच सुचलीय ही गझल .
मी आपली ऋणी आहे.
बहर
शुक्र, 05/11/2010 - 17:37
Permalink
सगळे शेर आवडले... तुमच्या
सगळे शेर आवडले... तुमच्या गझला आवर्जून वाचतो. शुभेच्छा.
विद्यानंद हाडके
सोम, 15/11/2010 - 08:03
Permalink
चांदण्याचा दाहदायी ज्वर नको
चांदण्याचा दाहदायी ज्वर नको !
दे मिठी दे.......! आर्ततेचा स्वर नको !! ............. मतला सुंदरच
रोमरोमी स्पर्श चंदन-केवडा !
एक फ़ुंकर.......! मोतियांची सर नको !!
धुंद तू ही , धुंद शेजी मोगरा !
श्वास हळवे......! बोलण्याची भर नको !! ......... अदभुतरम्य... मस्तच
मीलनांती ना उरावी भिन्नता !!
एक रुपे..........! व्यर्थ मादी-नर नको !! ........ येथे यति भंगचा धोका संभवतो
आणि आनंदयात्रीशी सहमत...
सुप्रिया...खुप खुप शुभेच्छा........
विद्यानंद हाडके
शुक्र, 19/11/2010 - 07:19
Permalink
मीलनांती ना उरावी भिन्नता
मीलनांती ना उरावी भिन्नता !!
एक रुपे..........! व्यर्थ मादी-नर नको !! ........ अर्थाच्या सदर्भाने येथे यति भंगचा धोका संभवतो
चु. भु. दे. घे.
supriya.jadhav7
शुक्र, 21/01/2011 - 19:46
Permalink
बहरजी ...खरोखर ईथल्या
बहरजी ...खरोखर ईथल्या मार्गदर्शनाने खुप खुप लाभ होतो.
विद्यानंदजी.....
मी आपली शतशः ऋणी आहे या अनमोल अभिप्रायाबद्दल,
खरच ईतक्या झटपट ही गझल मी पोस्ट केली की यतिभंग होतोय या नि अशा गोष्टींकडे
दुर्लक्षच झाल खर...
पुढील गझलेत नक्कीच काटेकोर राहिन.
धन्यवाद !