चुंबिण्या येऊ नको तू

संपलेला ध्यास आता
दोन उरले श्वास आता

मोडुनी त्रिज्या सुखाच्या
विश्व केले व्यास आता

स्वप्न ती देऊन गेली
सत्य भासे भास आता

जिंकुनी पैजा विजांच्या
सोसुदे मधुमास आता

ओंजळी अश्रु तुझा "ही "
फक्त उरली प्यास आता

चुंबिण्या येऊ नको तू
डंख मुरले आत आता

घेउनी संन्यास जावे
हा खरा हव्यास आता

मयुरेश साने..दि.२५-ऑक्टोबर-२०१०

गझल: 

प्रतिसाद

ठीक ठाक..!!!

चुंबिण्या येऊ नको तू
डंख मुरले आत आता....घाई केली ना?

स्वप्न ती देऊन गेली
सत्य भासे भास आता
वा!!!

सत्य-स्वप्नाचा शेर छान आहे.
एकाच शेरात यमक का सोडले, कळले नाही.

पुलेशु.