रात्र झाली फ़ार आता !!!

रात्र झाली फ़ार आता !!!
.
रात्र झाली फ़ार आता !
तार किंवा मार आता !!

दु:ख माझे राजवर्खी,
सौख्य खाई खार आता !

भौतिकाच्या भोगवाटा,
आकळेना सार आता !

आस खोटी सावल्यांची,
ऊन वाटे वार आता !

डागल्या तोफ़ाच ऐशा,
गारदी ही गार आता !

वळकटीला बांधले रे,
राहिलेले चार आता !!

-सुप्रिया (जोशी) जाधव.

गझल: 

प्रतिसाद

गार झालो वाचून.. वा. छान गझल.

धन्यवाद 'बहर' जी !!!