गझल

गझल

मिसरे

रदीफ़ ना काफ़िया- अलामत, सुटेसुटेसे चुकार मिसरे
जुन्या वहीचे कवाड खोलुन खुणावणारे हजार मिसरे

अनंत वाटांवरून माझा प्रवास चाले तुझ्या दिशेने,
जिथेतिथे सोबतीस माझ्या नवेजुने बेसुमार मिसरे

गझल: 

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या..

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या बसतो..
पडतात कवडसे..त्यांना पाहुन हसतो..

ओंजळीत आहे पुरचुंडी स्वप्नांची..
ती घेऊन जेथे जागा मिळते..बसतो..

देतात दिलासे ऋतुही जाता जाता..

गझल: 

शिखर त्यांनी गाठलेले -

शिखर त्यांनी गाठलेले, पायथा धुंडाळतो
चालती तो-यात सारे मीच का ठेचाळतो |१|

देव दगडांतील येथे पुजुन का कंटाळतो
माणसांतिल देव तेथे पूजणे ना टाळतो |२|

शोभती जरि आज कपडे भरजरी अंगावरी

गझल: 

मी डाव मांडलेला........

मी डाव मांडलेला........

जिंकून हारण्या तो... मी डाव मांडलेला
तो खेळवून गेला... हा जीव बांधलेला

चालून आज आले...त्या दूरच्याच वाटा
भेटेल का किनारा....वाराच थांबलेला

गझल: 

मरण्यात अर्थ नाही

मरण्यात अर्थ नाही

संवेदनेत आता, जगण्यात अर्थ नाही
जाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही

आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे
आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही

गझल: 

पुन्हा पुन्हा !!

तुझाच स्पर्श मल्मली छळेल हा पुन्हा पुन्हा !
तुझ्या स्म्रृतीत चांदवा जळेल हा पुन्हा पुन्हा !!

उनाडतो, पिसाटतो, ठरे कुठे वरुण हा?
सलज्ज ओठ चुंबिण्या वळेल हा पुन्हा पुन्हा !!

गझल: 

आज भारंभार झाली आसवे !!!

आज भारंभार झाली आसवे !!!
.
*

पापण्यांना भार झाली आसवे,
कैकदा ’गद्दार’ झाली आसवे !

*

साजणाचे ओठ गाली टेकता,
लाजरा शृंगार झाली आसवे !

*

झोंबरे होते तडाखे वादळी,

गझल: 

बंडाचा झेंडा कधीच नव्हता हाती!

जातात वृक्ष वादळात, तरती पाती,
आभाळ पेल तू, नकोस विसरू माती

प्रत्येक पावलागणिक बेट काट्यांचे,
माझीच पैंजणे दगा देउनी जाती

केव्हाच सोडली माझी वाट दिव्यांनी,
अंधार एकला जन्माचा सांगाती

गझल: 

Pages