मिसरे

रदीफ़ ना काफ़िया- अलामत, सुटेसुटेसे चुकार मिसरे
जुन्या वहीचे कवाड खोलुन खुणावणारे हजार मिसरे

अनंत वाटांवरून माझा प्रवास चाले तुझ्या दिशेने,
जिथेतिथे सोबतीस माझ्या नवेजुने बेसुमार मिसरे

जमीन नाही पहात, मात्रा मोजत नाही, वृत्तहि नाही,
मनात येते तेच सांगती, बहर नसे तरि बहार मिसरे

तुझी ठेव ही धुंद शायरी, तुझ्याच गझला, तुझेच नग़मे,
घुसमटताना जगण्यासाठी तूच दिलेले उधार मिसरे!

नकार खोटा ओठांवरचा, मनात आहे रुकार दडला,
नकार होकारात बदलती खुल्या दिलाची पुकार मिसरे

तिच्या खळीच्या शिंपल्यातला मोती पाउस घेउन गेला,
उनाड वारा तिच्या बटांवर लिहून गेला चिकार मिसरे!

गझल: 

प्रतिसाद

वा वा वा!!!

तिच्या खळीच्या शिंपल्यातला मोती पाऊस घेउन गेला..
उनाड वारा तिच्या बटांवर लिहून गेला चिकार मिसरे...

वा!

जमीन नाही पहात, मात्रा मोजत नाही, वृत्तहि नाही,
मनात येते तेच सांगती, बहर नसे तरि बहार मिसरे

वा वा .. फार सुंदर शेर,, गझल आवडली.

****
अनंत वाटांवरून माझा प्रवास चाले तुझ्या दिशेने,
जिथेतिथे सोबतीस माझ्या नवेजुने बेसुमार मिसरे

खूप सहज आणि तितकाच सुरेख!

तिच्या खळीच्या शिंपल्यातला मोती पाउस घेउन गेला,
उनाड वारा तिच्या बटांवर लिहून गेला चिकार मिसरे!

उनाड!!! मस्त!

संपूर्ण गझल आवडली, शेवटचा शेर म्हणजे कहर!!!

खल्लास!
ज्ज्जाम आवडली..
गतीमुळे अधिक आवडली...

रदीफ़ ना काफ़िया- अलामत, सुटेसुटेसे चुकार मिसरे
जुन्या वहीचे कवाड खोलुन खुणावणारे हजार मिसरे

अनंत वाटांवरून माझा प्रवास चाले तुझ्या दिशेने,
जिथेतिथे सोबतीस माझ्या नवेजुने बेसुमार मिसरे

वाव्वा. शेवटचा शेरही विशेष. एकंदर आकर्षक झाली आहे. मिसरे ह्या शब्दाऐवजी ओळी हे अन्त्ययमकही घेऊन वाचून बघितले.

वा! मस्तच गझल, खूप आवडली.
तिच्या खळीच्या शिंपल्यातला मोती पाउस घेउन गेला,
उनाड वारा तिच्या बटांवर लिहून गेला चिकार मिसरे!
हा शेर फारच क्लास!

घुसमटताना जगण्यासाठी तूच दिलेले उधार मिसरे>>> व्वा व्वा!

गझलही आवडलीच. पण काही काही शेर समजले नाहीत. मी मागे असे कुठेतरी वाचलेले होते की मतल्यात अक्षरगणवृत्त असल्यास ते पाळले जावे. अर्थात, आशय महत्वाचा हेच सगळ्यात खरे! पण या गझलेतील इतर शेर नीटसे पटले नाहीत मला.

महत्वाचे - ही जमीन फारच आकर्षक वाटली व आवडली. (चित्तरंजन यांच्या 'ओळी' या पर्यायाशीही सहमत आहे.)

आपल्या अजून गझलांच्या प्रतीक्षेत!

-'बेफिकीर'!

छान.......