गझल

गझल

नशीब माझे...

पुन्हा पुन्हा मी आजमावले नशीब माझे
कधीच नाही कसे बदलले नशीब माझे?...

मी दु:खांना सामोरे गेल्यावर कळले;
या दु:खांनी होते भरले नशीब माझे...

अजूनही मी का आशेने स्वप्ने बघतो?

गझल: 

मी फुलांची मूक भाषा जाणतो.....

मी फुलांची मूक भाषा जाणतो
दाह त्यांच्या आसवांचा जाणतो....१.

रोज मी जातो खुल्या पायी वनीं
कंटकांचा ही जिव्हाळा जाणतो !....२.

मी वनाच्या सर्व वाटा पाहिल्या
कोण केव्हां लूटतो हे जाणतो....३.

पारध्यानो ! , या शिका भाषा नव्या
पाखरांच्या सर्व भाषा जाणतो !....४.

ये जरा तू आज माझ्या ही घरी
काळजी घेणे तसे मी जाणतो....५.

फार नाही आज मी रडणार रे...
मी तुझ्या ही भावनांना जाणतो....६.

प्रेम नाही फार कोणी ही करू
खेळ हा सोपा न साधा जाणतो....७.

` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / 0६-०८-२००९.

गझल: 

Pages