गझल

गझल

गझल : मी तुझ्या प्रेमात आहे, तू मला ही प्रेम कर......

गझल : ८

मी तुझ्या प्रेमात आहे, तू मला ही प्रेम कर
आरसा आहे तुझा मी, तू मला ही प्रेम कर....१.

जी व्यथा मी रोज माझ्या अंतरी सांभाळतो
आज माझ्या त्या व्यथेशी तू कसा ही खेळ कर....२.

का असावी आज माझ्या काळ्जाला काळ्जी ?
हे वज़न नाही गझल की ! तू तयाशी खेळ क र....३.

ईश्वराची ही क्रुपा की तू मला सांभाळ्ले !
मी न त्याचा की न ह्याचा, तू मला ही प्रेम कर....४.

आज आहे मी जगाच्या एक जागी एकटा
शोध माझा तू च घे रे, तू मला ही प्रेम कर....५.

` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / १७-०७-२००९.

गझल: 

ग झ ल : मला का तो वियोगाची व्यथा देतो ?

ग झ ल : ७

मला का तो वियोगाची व्यथा देतो ?
कधी कुंती, कर्णाची ही व्यथा देतो ....१.

कधी काढून घेतो तो कवच माझे
कधी शापात ही तो दुर्दशा देतो....२.

फुलांची मी मनोभावे पुजा केली
मला तो रोज काट्यांची मजा देतो....३.

कधी स्वप्नात येऊनी व्यथा देतो
कधी घावात राहूनी मजा देतो....४.

उठवतो हात जेव्हां मी दुवे साठी
मला भिक्षेत ही तो ही सज़ा देतो....५.

असा आहे ` ख़लिश ' तो पीर वेड्यांचा
शहाण्यांची बघा वेडा मजा घेतो....६.

` ख़लिश ' / विठ्ठल घारपुरे / १६-०७-२००९.

गझल: 

साकी मला तू असा, गळका जाम देऊ नको

गझल - ६.(क) : दुरूस्त आणी पुनः संपादित

साकी मला तू असा, गळका जाम देऊ नको
माझ्या कमी जिंदगीचा, इलज़ाम घेऊ नको....१.

कापूर ही जिंदगी माझी, फार नाही मुभा
निरांजनी व्यर्थ माला, हा डाम देऊ नको....२.

हे प्रारब्ध जाण की , मी आहे तुझा सोबती
निष्कारणी आशिकाचे, इमान घेऊ नको....३.

मी ज्या घरी आज आहे, ते ना मला लाभले
बाकी तसा मी बरा आहे, मान देऊ नको....४.

तो मोले रडला, असा मी आरोप नाही करत
तू आज माझ्या चितेचे, सामान देऊ नको....५.

` ख़लिश '-विठ्ठल घारपुरे / १६-७-२००९ /१८.३८.

गझल: 

गझल - ६.(ब) : साकी मला तू असा, गळका जाम देऊ नको : दुरूस्त आणी पुनः संपादित

गझल - ६.(ब) : दुरूस्त आणी पुनः संपादित

साकी मला तू असा, गळका जाम देऊ नको
माझ्या कमी जिंदगीचा, इलज़ाम घेऊ नको....१.

कापूर ही जिंदगी माझी, फार नाही मुभा
निरांजनी व्यर्थ माला, हा डाम देऊ नको....२.

हे प्रारब्ध जाण की , मी आहे तुझा सोबती
निष्कारणी ह्या ग़रीबाचा, प्राण घेऊ नको....३.

मी ज्या घरी आज आहे, ते ना मला लाभले
बाकी तसा मी बरा आहे, मान देऊ नको....४.

तो मोले रडला, असा मी आरोप नाही करत
तू आज माझ्या शवा वर, सन्मान देऊ नको....५.

` ख़लिश '-विठ्ठल घारपुरे / १६-७-२००९ /१४.३०.

गझल: 

भूमिका

पाठ वा-याने फिरविली ती दिशा माझीच होती..

मूक, हळवी, दीन, शापित नायिका माझीच होती

दैव दुबळे; शाप माझा भोगते जन्मांतरी मी

राम तो नव्हता, अहिल्येची शिळा माझीच होती

एकही नव्हता दिवा, ना काजवा होता कुठेही

चांदणे ना चंद्र, अवसेची निशा माझीच होती

गझल: 

Pages