गझल : रात्र सारी चांदण्याने दु:खः माझे पाहिले - पु नः संपादित
Posted by खलिश on Sunday, 21 June 2009रात्र सारी चांदण्याने दु:खः माझे पाहिले - पु नः संपादित
१.
रात्र सारी चांदण्याने दु:खः माझे पाहिले
अंतराच्या हुंदक्याने शल्य माझे पाहिले....१.
जे कधी माझे न होते,स्वप्न ते मी पाहिले
काळजाच्या चिंधड्या नी रक्त माझे पाहिले....२.
ईश्वराची हि असावी अल्प कि मोठी क्रुपा
ह्या जगी मी भांडताना मित्र माझे पाहिले....३.
श्वास माझा क्षीण होता, ना कधी रडले कुणी
मी हवे चा हा दगा, नी भोग माझे पाहिले....४.
तू नको जाऊस सारा भार ऊरी घेउनी
सोडवूनी हात गेले, आप्त माझे पाहिले....५.
(सोडवूनी हात जाती, मित्र माझे पाहिले....५.)
- ` खलिश ' - - विठ्ठल घारपुरे, अहमदाबाद. / २१-०६-२००९.
मान्यवर, आपल्या सूचनांचा आदर करून मी माझ्या गझल मधे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. गझल पुनः पाठवत आहे. प्रतिसादाची वाट पाहतो आहे. असाच लोभ कायम असावा हि विनंती.
आपला,
- ` खलिश ' - विठ्ठल घारपुरे, अहमदाबाद. / २१-०६-२००९.