ग झ ल : रात्र थोडी गार होती .....
५.
रात्र थोडी गार होती , नी तुझा सहवास पण
मैकद्याचा कैफ होता,मोगरयाचा वास पण ....१.
तो अबोला जाळणारा,नी तुझी कातिल नजर
बांगड्यांच्या लय ध्वनि वर चालणारे श्वास पण....२.
मी न माझा राहिलो नी , तू न तुझ्या बंधनी
ईश्वराचा भास देई , ते गुलाबी भास पण....३.
केतकीचे हे जणू सारे च वन मी घेतले
आज बाहूपाश माझे दंश झेली आग पण....४.
हे स्मरण त्या मोहरात्रींचे कसे विसरू ` खलिश '
तो खरा आस्वाद होता, नी जिवाचा नाद पण....५.
` खलिश '- विठठ्ल घारपुरे / अहमदाबाद / २०-०६-२००९.
गझल: