गझल - ६.(ब) : साकी मला तू असा, गळका जाम देऊ नको : दुरूस्त आणी पुनः संपादित
गझल - ६.(ब) : दुरूस्त आणी पुनः संपादित
साकी मला तू असा, गळका जाम देऊ नको
माझ्या कमी जिंदगीचा, इलज़ाम घेऊ नको....१.
कापूर ही जिंदगी माझी, फार नाही मुभा
निरांजनी व्यर्थ माला, हा डाम देऊ नको....२.
हे प्रारब्ध जाण की , मी आहे तुझा सोबती
निष्कारणी ह्या ग़रीबाचा, प्राण घेऊ नको....३.
मी ज्या घरी आज आहे, ते ना मला लाभले
बाकी तसा मी बरा आहे, मान देऊ नको....४.
तो मोले रडला, असा मी आरोप नाही करत
तू आज माझ्या शवा वर, सन्मान देऊ नको....५.
` ख़लिश '-विठ्ठल घारपुरे / १६-७-२००९ /१४.३०.
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
शुक्र, 17/07/2009 - 19:56
Permalink
काफिया
मा. विश्वस्त,
या रचनेत 'देऊ ', 'घेऊ ' असे कवाफी आहेत असे वाटते.
आपल्या मताचा अभिलाषी!
आभार!