गझल

गझल

हुंदका साधा तुझा सांगून गेला

द्वाड होता शब्द माझा बांधलेला
मोकळा केला तसा बोलून गेला!

कोणती ही रीत झाली वागण्याची?
भेटण्याची वेळ तो पाळून गेला!

गझल: 

माझ्या मनासी कळेना

कधी हेच माझ्या मनासी कळेना
तुझे आणि माझे कसे का जुळेना?

उगाची किती त्रास मी देउ सांग
अजूनी कसे तू जरासी छळेना ?

गझल: 

ग झ ल : ७ (अ) : दुरूस्त आणी पुनः संपादित : मला तो का वियोगाची व्यथा देतो ?

ग झ ल : ७ (अ) : दुरूस्त आणी पुनः संपादित

मला तो का वियोगाची व्यथा देतो ?
कधी कुंती, कर्णाची ही व्यथा देतो ....१.

कधी काढून घेतो तो कवच माझे
कधी सेवेत ही तो दुर्दशा देतो....२.

फुलांची मी मनोभावे पुजा केली
मला तो रोज काट्यांची मजा देतो....३.

कधी स्वप्नात येऊनी व्यथा देतो
कधी घावात राहूनी मजा देतो....४.

उठवतो हात जेव्हां मी दुवे साठी
मला भिक्षेत ही तो ही सज़ा देतो....५.

असा आहे ` ख़लिश ' तो पीर वेड्यांचा
शहाण्यांची बघा वेडा मजा घेतो....६.

` ख़लिश ' / विठ्ठल घारपुरे / १७-०७-२००९./२१.५८.

( मी ह्या गझल च्या मतला आणी दुसर्या शेर मधे सुधारणा केली आहे.कृपया ह्याची नोंध घ्यावी आणी मुआफी असावी )

गझल: 

Pages