आरपार
काढ कविते राग पोटावर
भावनांचा काफिला सावर
पाहिजे होते तसे झाले
जे नको ते सर्व झाल्यावर
'चांगले वागायचे होते'
सर्व गप्पा संपती यावर
डुंबणे कंटाळवाणे, पण
वाटले, बसशील काठावर
बांधतो बेकायदा टपऱ्या
मी सुखाच्या, दुःखरस्त्यावर
गझल:
तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा ? बदनाम झंझावात मी !