माझ्या मनासी कळेना
कधी हेच माझ्या मनासी कळेना
तुझे आणि माझे कसे का जुळेना?
उगाची किती त्रास मी देउ सांग
अजूनी कसे तू जरासी छळेना ?
कधीची नजर मी रोखली तुजवरी
अजूनी तुझी मान इकडे वळेना ?
तुझे भोवती मी घालतो घिरट्या
तुझे चित्त वेडे क्षणभरी ढळेना ?
इथे फोडतो मी किती रोज टाहो
तुझे लोचनी एक मोती गळेना ?
हरीश दांगट
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
रवि, 26/07/2009 - 20:38
Permalink
इथे फोडतो मी किती रोज टाहो
वा!
वृत्त थोडे इकडे-तिकडे आहे.
उगाची किती त्रास मी देउ सांगss - असे घ्यावे लागते आहे. ते बरोबर नाही वाटत.
कधीची नजर मी रोखली तुजवरी - या ऐवजी
कधीची नजर तुजवरी रोखली मी - असे बरे वाटेल.
लगागा लगागा लगागा लगागा - असे वृत्त असावे असे वाटते. त्यावरून सांगितले. अर्थात निर्णय कवीचाच.
कलोअ
चूभूद्याघ्या