ग झ ल : मला का तो वियोगाची व्यथा देतो ?
ग झ ल : ७
मला का तो वियोगाची व्यथा देतो ?
कधी कुंती, कर्णाची ही व्यथा देतो ....१.
कधी काढून घेतो तो कवच माझे
कधी शापात ही तो दुर्दशा देतो....२.
फुलांची मी मनोभावे पुजा केली
मला तो रोज काट्यांची मजा देतो....३.
कधी स्वप्नात येऊनी व्यथा देतो
कधी घावात राहूनी मजा देतो....४.
उठवतो हात जेव्हां मी दुवे साठी
मला भिक्षेत ही तो ही सज़ा देतो....५.
असा आहे ` ख़लिश ' तो पीर वेड्यांचा
शहाण्यांची बघा वेडा मजा घेतो....६.
` ख़लिश ' / विठ्ठल घारपुरे / १६-०७-२००९.
गझल: