नशीब माझे...
पुन्हा पुन्हा मी आजमावले नशीब माझे
कधीच नाही कसे बदलले नशीब माझे?...
मी दु:खांना सामोरे गेल्यावर कळले;
या दु:खांनी होते भरले नशीब माझे...
अजूनही मी का आशेने स्वप्ने बघतो?
नेहमीच तर असते ठरले नशीब माझे...
शब्दांनी मी कबूल काही नव्हते केले;
नजरेमधुनी तुला समजले, नशीब माझे!...
'अजब' ठरवले मी जे त्याच्या उलटे घडले
मला कधीही नाही फळले नशीब माझे...
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
गुरु, 13/08/2009 - 23:53
Permalink
पुन्हा पुन्हा मी आजमावले नशीब
वावा! मतला फार आवडला. फार सहज आणि सुंदर. तिसरा शेरही. अजबराव, एकंदर गझल आवडली.
भूषण कटककर
शुक्र, 14/08/2009 - 00:23
Permalink
शब्दांनी मी कबूल काही केले
शब्दांनी मी कबूल काही केले नव्हते
व्वा! हा शेर फार आवडला. सुंदर गझल!
क्रान्ति
शुक्र, 14/08/2009 - 19:56
Permalink
आवडली गझल. शब्दांनी मी कबूल
आवडली गझल.
शब्दांनी मी कबूल काही नव्हते केले;
नजरेमधुनी तुला समजले, नशीब माझे!...
भन्नाट!
पुलस्ति
शुक्र, 14/08/2009 - 21:36
Permalink
वा वा! शब्दांचा शेर फारच
वा वा!
शब्दांचा शेर फारच आवडला!!
अभिजीतसावंत
बुध, 19/08/2009 - 19:17
Permalink
शब्दांनी मी कबूल काही नव्हते
शब्दांनी मी कबूल काही नव्हते केले;
नजरेमधुनी तुला समजले, नशीब माझे!...
आवडले
गझल छान आहे
ॐकार
रवि, 23/08/2009 - 16:13
Permalink
पुन्हा पुन्हा मी आजमावले नशीब
पुन्हा पुन्हा मी आजमावले नशीब माझे
कधीच नाही कसे बदलले नशीब माझे?...
मस्त मस्त!
शब्दांनी मी कबूल काही नव्हते केले;
नजरेमधुनी तुला समजले, नशीब माझे!...
इथे नशीब माझे - असे म्हणण्यात श्लेष असावा असे धरून चालतो आहे. :) (म्हणजे तुला कळले का , वा वा - नशीब माझे ! अशा अर्थानेदेखील)