नशीब माझे...

पुन्हा पुन्हा मी आजमावले नशीब माझे
कधीच नाही कसे बदलले नशीब माझे?...

मी दु:खांना सामोरे गेल्यावर कळले;
या दु:खांनी होते भरले नशीब माझे...

अजूनही मी का आशेने स्वप्ने बघतो?
नेहमीच तर असते ठरले नशीब माझे...

शब्दांनी मी कबूल काही नव्हते केले;
नजरेमधुनी तुला समजले, नशीब माझे!...

'अजब' ठरवले मी जे त्याच्या उलटे घडले
मला कधीही नाही फळले नशीब माझे...

गझल: 

प्रतिसाद

पुन्हा पुन्हा मी आजमावले नशीब माझे
कधीच नाही कसे बदलले नशीब माझे?..

वावा! मतला फार आवडला. फार सहज आणि सुंदर. तिसरा शेरही. अजबराव, एकंदर गझल आवडली.

शब्दांनी मी कबूल काही केले नव्हते

व्वा! हा शेर फार आवडला. सुंदर गझल!

आवडली गझल.

शब्दांनी मी कबूल काही नव्हते केले;
नजरेमधुनी तुला समजले, नशीब माझे!...
भन्नाट!

वा वा!
शब्दांचा शेर फारच आवडला!!

शब्दांनी मी कबूल काही नव्हते केले;
नजरेमधुनी तुला समजले, नशीब माझे!...

आवडले
गझल छान आहे

पुन्हा पुन्हा मी आजमावले नशीब माझे
कधीच नाही कसे बदलले नशीब माझे?...

मस्त मस्त!

शब्दांनी मी कबूल काही नव्हते केले;
नजरेमधुनी तुला समजले, नशीब माझे!...

इथे नशीब माझे - असे म्हणण्यात श्लेष असावा असे धरून चालतो आहे. :) (म्हणजे तुला कळले का , वा वा - नशीब माझे ! अशा अर्थानेदेखील)