गझल

गझल

''वाटत आहे''

दार मनाचे उघडावेसे वाटत आहे
मज माझ्याशी झगडावेसे वाटत आहे

तेल्,तूप संपले राहिले धुपाटणे अन,
अता वाळूला रगडावेसे वाटत आहे

खुले खुले राहण्यात नाही मजा लोक हो !!
स्वतःस आता जखडावेसे वाटत आहे

गझल: 

अचाट तारे तोडत होता

अचाट तारे तोडत होता
अफाट धो धो बोलत होता

गटार नाले शोधत होता
घशात दारू ओतत होता

नसेच बुद्धी आणिक लज्जा
उगाच बोंबा ठोकत होता

जळोत दुःख्खे सर्व जणांची
नशेत हे तो घोकत होता

गझल: 

इथे माझा ॠतू आहे इथे राहू नका कोणी...

जिथे मी चाललो आहे तिथे जाऊ नका कोणी
कधीही जन्म कोणाला असा वाहू नका कोणी

नशील्या हासण्याने मैफली तू जिंकल्या सार्‍या
कशी ही भैरवी विनवी मला गाऊ नका कोणी

गझल: 

पांढरा किडा

पांढरा किडा

तुझी सांग येथे दखल कोण घेतो
कशाला घशाला उगा त्रास देतो

असामान्य विश्लेषकांच्या भितीने
गझल घप्प कपड्यात झाकून नेतो

नवे रोप लावत पुढे चालताना

गझल: 

म्हणालो त्यातले काहीच मी करणार नाही

बनावाला तुझ्या बिल्कूल मी बधणार नाही
डिवच तू पाहिजे तितके, कधी चिडणार नाही

नको लावून घेऊ घोर माझ्या बोलण्याचा
म्हणालो त्यातले काहीच मी करणार नाही

जरासे पाहिले माझ्याकडे आत्मीयतेने

गझल: 

पाऊल वळले...

पाऊल वळले
तेथेच मळले

युद्धात वरले
प्रेमात छळले

मुखडा चमकला
हृदयात जळले

कोणीच नव्हते;
उपहास टळले

विरहातले 'पण';
विरहात ढळले

इतकेच कळले...
'काही न कळले..'

लढ तू अजय; ...बघ-

गझल: 

कुणाशी बोलता आहात याची कल्पना आहे?

'शहाणा होउनी मरशील ही संभावना आहे'
कुणाशी बोलता आहात याची कल्पना आहे?

तुझ्याशी त्याच निष्ठेने पती वागायचा नाही
तुझे आजन्म पातिव्रत्य ही वारांगना आहे

पुरे आयुष्य काढावे तरी माहीत नाही की

गझल: 

''जमले''

काय झाले जर तुला मुखडे बदलणे जमले?
हो ! मला सुद्धा तुझ्या साच्यात बसणे जमले

पाहुनी धाग्यास जळताना प्रकाशासाठी
मेणही गेले शिकुन,.... त्याला वितळणे जमले

वावटळ वेडी जराशी काय ती भेटावी,

गझल: 

Pages