गझल

गझल

नव्या यमांची नवीन भाषा

नव्या यमांची नवीन भाषा

मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा

पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा

गझल: 

मी जिथे नाही अशी जागाच नाही

मी जिथे नाही अशी जागाच नाही
प्रश्न 'मी आहे कुठे' इतकाच नाही

बाप या दुनियेत, आकाशात आई
मी गझल आहे जिचा मतलाच नाही

लोक अस्तित्वामुळे दु:खात सारे
जन्मला नाहीच त्याला जाच नाही

गझल: 

तू भेटली नव्हतीस तोवर

तू भेटली नव्हतीस तोवर चालले होते बरे
लक्षात नाही यायचे तेव्हा मनावरचे चरे

आपण जिथे भेटायचो ही त्या पुलाचीही व्यथा
चिक्कार पाणी वाहिले उरले तरीही भोवरे

ईमेल, एसेमेस येती रोज पाचोळ्यापरी

गझल: 

मनात माझ्या कुठून येते बरेच काही?

ठरून येते, चुकून येते, बरेच काही
मनात माझ्या कुठून येते बरेच काही?

भणंग संध्या, भकास राती, उजाड स्वप्ने
नसेल ती तर जमून येते बरेच काही

जमेल तितकीच ठेवतो मी विनम्र वाणी

गझल: 

रुढी परंपरेचा का बांधलास शेला?

रुढी परंपरेचा का बांधलास शेला?
या मानवी जगाच्या टाळून सभ्यतेला

येथील संस्क्रुतीला मी हा सवाल केला
वस्तीत माणसांच्या माणूस का भुकेला?

काबा नको न काशी बस हाक द्या स्वत:ला

गझल: 

............. अजून काही

हवे कशाला हसावयाला, नवे बहाणे अजून काही
तयार झाले जगावयाला नवे दिवाणे अजून काही...

हरेल शत्रू , नव्या दमाने चला लढाई लढावयाला
मिळून गाऊ पराक्रमाचे नवे तराणे अजून काही...

गझल: 

लाथाडती सारे मला

खोटे असो किंवा खरे ज्याचेच जो तो भोगतो
जागाच आहे देव तो पापे तुझी तो मोजतो

लाथाडणारे पाय ते झेलू कसे छातीवरी
आसूड तो पाठीवरी का मारता हो रोज तो

गझल: 

सोयरा

श्रावणाने आटलेला तो झरा माझाच होता
वादळांनी बांधलेला आसरा माझाच होता

कैक त्या पात्रात गेले, अन् सुखे परतून आले,
मी बुडाले एकटी, तो भोवरा माझाच होता

तो जरी चुकवून गेला ताल माझ्या बंदिशीचा,

गझल: 

Pages