गझल

गझल

एखादा तरी...

आज श्वासांनो भरा हुंकार एखादा तरी
चेतवा राखेतुनी अंगार एखादा तरी

कोठवर टिकणार कुंपण तत्त्व नियमांचे तुझे
स्पर्श माझा वादळी ठरणार एखादा तरी

साथ दे वा स्वप्न दे वा आठवांचा गाव दे

गझल: 

चिडता का हो ?

वेडे मी जगतास म्हणालो चिडता का हो?
कुचकामी इतिहास म्हणालो चिडता का हो?

श्रीमंतीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनाला
गरिबीचा उपहास म्हणालो चिडता का हो

खटपट केली मंत्री झाले ते दरबारी

गझल: 

छायेलाही त्यांच्या थोडा

अपुल्यांपासुन दूर जरा मी फटकुन आहे
छायेलाही त्यांच्या थोडा बिचकुन आहे

विश्वासाचा घात कधी ना शत्रू करतो
अपुल्यांचा तो हक्क, तयांना दचकुन आहे

बोथट झालो शल्य मनाला बोचत नाही

गझल: 

निघाले अर्थ नाही ते तुझ्या वाटेत येण्याचे

तुझ्या लक्षात ना आले जिथे संकेत येण्याचे
पुरावे कोणते मीही तुला द्यावेत येण्याचे?

सदा डोक्यात करता घोळका नाना विचारांनो
जराही भान नाही का तुम्हा रांगेत येण्याचे?

गझल: 

मावळाया लागलो

उगवणे भाग्यात नव्हते मावळाया लागलो
वेदनांचे गाव जिकडे मी उडाया लागलो

ओळखीची वाटली ती भेटता हसली तशी
बालपण मी ताण देउन आठवाया लागलो

देव कोणा पावलेला पाहिला नाही कधी

गझल: 

पडल्यापडल्या जागोजागी उसवत आहे

काठी, परशू, भाला, सारे जमवत आहे
मी बेरड होण्याचे पक्के ठरवत आहे

माझ्या सज्जनतेची केवळ चेष्टा झाली
फांदेबाजी माझी बक्षिस मिळवत आहे

आयुष्याची ऐरण झिजली असताना मी

गझल: 

पुन्हा केव्हातरी बोलू...

नको मित्रा, नको आता, पुन्हा केव्हातरी बोलू
जिव्हारी लागल्या जखमा, अती झाल्यावरी बोलू

अताशा शब्दही सारे, थिटे पडतात सांगाया
जरासा अर्थ शब्दांना, नवा आल्यावरी बोलू

गझल: 

काय आहे तुझ्याकडे माझे

नेहमीचेच हे रडे माझे
काय आहे तुझ्याकडे माझे

मीच घेतो अता धडे माझे
रोज पाडून पोपडे माझे

काय बोलायचे उन्हाळ्यांना
पावसाळेच कोरडे माझे

दोष थोडा असेल वाटेचा
पाय थोडेच वाकडे माझे

गझल: 

Pages