पडल्यापडल्या जागोजागी उसवत आहे

काठी, परशू, भाला, सारे जमवत आहे
मी बेरड होण्याचे पक्के ठरवत आहे

माझ्या सज्जनतेची केवळ चेष्टा झाली
फांदेबाजी माझी बक्षिस मिळवत आहे

आयुष्याची ऐरण झिजली असताना मी
कुठल्या विश्वासाने सळई बडवत आहे?

तकलादू धाग्यांनी विणले माझे जीवन
पडल्यापडल्या जागोजागी उसवत आहे

मी घाबरलो येथे येइल त्या दु:खाला
जो जो 'कणखर' झाला तो तो मिरवत आहे
-------------------------------
विजय दिनकर पाटील 'कणखर'

गझल: 

प्रतिसाद

सरळ, थेट आणि छान गझल.

माझ्या सज्जनतेची केवळ चेष्टा झाली
फांदेबाजी माझी बक्षिस मिळवत आहे

आयुष्याची ऐरण झिजली असताना मी
कुठल्या विश्वासाने सळई बडवत आहे?

तकलादू धाग्यांनी विणले माझे जीवन
पडल्यापडल्या जागोजागी उसवत आहे
...

फार छान शेर. चांगली गझल.

मस्त गझल.
'फांदेबाजी' शब्द आवडला. :)

मस्तच!!!!

सर्वांचे मनापासून आभार!!

खूप सही !

आभारी आहे श्रीवत्स!!

आयुष्याची ऐरण झिजली असताना मी
कुठल्या विश्वासाने सळई बडवत आहे?

तकलादू धाग्यांनी विणले माझे जीवन
पडल्यापडल्या जागोजागी उसवत आहे>>>

व्वा व्वा!

पडल्या पडल्या चा इफेक्ट मस्तच आलाय.