मनात माझ्या कुठून येते बरेच काही?
ठरून येते, चुकून येते, बरेच काही
मनात माझ्या कुठून येते बरेच काही?
भणंग संध्या, भकास राती, उजाड स्वप्ने
नसेल ती तर जमून येते बरेच काही
जमेल तितकीच ठेवतो मी विनम्र वाणी
बरेचदा मग मधून येते बरेच काही
गुलाम इतका बनून जातो सजावटीचा
चितेवरीही सजून येते बरेच काही
कुणाकुणाला छदाम नाही, कुणाकुणाला
पिढ्यापिढ्यांचे असून येते बरेच काही
खरेच त्यांना असेल भीती पराभवाची
तहास त्यांच्याकडून येते बरेच काही
बनून 'कणखर' जगात केवळ जमेल कैसे?
सुखात जगण्या अजून येते बरेच काही
गझल:
प्रतिसाद
विद्यानंद हाडके
सोम, 07/03/2011 - 08:04
Permalink
गुलाम इतका बनून जातो
गुलाम इतका बनून जातो सजावटीचा
चितेवरीही सजून येते बरेच काही ..................... अप्रतिम विजयजी...
कुणाकुणाला छदाम नाही, कुणाकुणाला
पिढ्यापिढ्यांचे असून येते बरेच काही ................ क्या बात है ...
अजय अनंत जोशी
मंगळ, 08/03/2011 - 07:58
Permalink
१ला शेर, २रा शेर
१ला शेर, २रा शेर छानच.
शेवटचाही.....
कैलास गांधी
मंगळ, 08/03/2011 - 13:48
Permalink
खुप छान!!!!
खुप छान!!!!
गंगाधर मुटे
मंगळ, 08/03/2011 - 20:09
Permalink
गुलाम इतका बनून जातो
फारच सुंदर.
विजय दि. पाटील
बुध, 23/03/2011 - 09:04
Permalink
सर्वांचे मनापासून आभार!!
सर्वांचे मनापासून आभार!!
चित्तरंजन भट
बुध, 23/03/2011 - 11:06
Permalink
ठरून येते, चुकून येते, बरेच
वा. एकूणच गझल चांगली झाली आहे.
विजय दि. पाटील
गुरु, 07/04/2011 - 14:58
Permalink
धन्यवाद चित्तजी
धन्यवाद चित्तजी
ज्ञानेश.
शुक्र, 08/04/2011 - 13:18
Permalink
वाव्वा.. पहिले दोन शेर फारच
वाव्वा.. पहिले दोन शेर फारच आवडले !
गझल सुंदरच !
विजय दि. पाटील
मंगळ, 12/04/2011 - 10:18
Permalink
धन्यवाद ज्ञानेशराव!!
धन्यवाद ज्ञानेशराव!!
अमित वाघ
रवि, 15/05/2011 - 22:06
Permalink
रदीफ एकदम छान आहे.... आणि
रदीफ एकदम छान आहे....
आणि गझलही...
विजय दि. पाटील
रवि, 22/05/2011 - 15:00
Permalink
धन्यवाद अमित
धन्यवाद अमित
बेफिकीर
सोम, 23/05/2011 - 23:34
Permalink
व्वा! मस्त गझल! इतरत्र
व्वा! मस्त गझल!
इतरत्र प्रतिसाद दिलाच होता, आज पुन्हा वाचली.