''वाटत आहे''
दार मनाचे उघडावेसे वाटत आहे
मज माझ्याशी झगडावेसे वाटत आहे
तेल्,तूप संपले राहिले धुपाटणे अन,
अता वाळूला रगडावेसे वाटत आहे
खुले खुले राहण्यात नाही मजा लोक हो !!
स्वतःस आता जखडावेसे वाटत आहे
काल पाहिली 'ती' नवतरुणी डोळे भरुनी
मलाही थोडे बिघडावेसे वाटत आहे
मनासारखे घडत नसावे ''कैलासाच्या''
उभ्या जगाला बदडावेसे वाटत आहे.
--डॉ.कैलास गायकवाड
गझल:
प्रतिसाद
कैलास गांधी
बुध, 04/04/2012 - 13:31
Permalink
कैलास जी मझा आ गया!
कैलास जी मझा आ गया!
संतोष खवळे
सोम, 13/08/2012 - 04:06
Permalink
उभ्या जगाला बदडावेसे वाटत आहे
उभ्या जगाला बदडावेसे वाटत आहे ! :)
आशिष सरतापे
मंगळ, 22/07/2014 - 00:24
Permalink
शेवट सुरेख केला सर
शेवट सुरेख केला सर