पांढरा किडा
पांढरा किडा
तुझी सांग येथे दखल कोण घेतो
कशाला घशाला उगा त्रास देतो
असामान्य विश्लेषकांच्या भितीने
गझल घप्प कपड्यात झाकून नेतो
नवे रोप लावत पुढे चालताना
कुणी सांड मागून तुडवीत येतो
पिके फस्त केली फळे पोखरूनी
कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो
अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी
कुणाच्याच बापास ना घाबरे तो
गंगाधर मुटे
..........................................
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 23/03/2011 - 11:29
Permalink
नवे रोप लावत पुढे
वावा..
तुम्ही नव्या प्रतिमा गझलेत आणताहात ही अतिशय चांगली गोष्ट आहे. एकंदरच शेरात अधिक गोलाई, टोकदारपणा (सपाटपणाच्या विरुद्ध) असल्यास अधिक मजा येते. विधानांच्या पुढेही ती द्विपदी गेल्यास उत्तम. त्यामुळे दोन ओळींत थोडी विचार करायला, श्वास घ्यायला मोकळी जागाही सोडायला हवी असे म्हटले जाते.
गंगाधर मुटे
सोम, 28/03/2011 - 09:04
Permalink
धन्यवाद चित्तजी.
धन्यवाद चित्तजी.