इथे माझा ॠतू आहे इथे राहू नका कोणी...

जिथे मी चाललो आहे तिथे जाऊ नका कोणी
कधीही जन्म कोणाला असा वाहू नका कोणी

नशील्या हासण्याने मैफली तू जिंकल्या सार्‍या
कशी ही भैरवी विनवी मला गाऊ नका कोणी

जिवाचा प्राण तो आत्मा मला सांगून थकलेला
कुठे अद्रुष्य मी आहे ? मला पाहू नका कोणी

तसा मी भेटलो आहे चेहर्‍याला मुखवट्याला
इथे माझा ॠतू आहे इथे राहू नका कोणी

मिळाले पुण्य पाप्यांना करूनी नेटकी स्नाने
अता गंगेत ही चुकुनी कधी न्हाऊ नका कोणी

मयुरेश साने...दि..२३-मार्च-११

गझल: 

प्रतिसाद

मिळाले पुण्य पाप्यांना करूनी नेटकी स्नाने
अता गंगेत ही चुकुनी कधी न्हाऊ नका कोणी

वा!
इथे माझा ॠतू आहे इथे राहू नका कोणी

हा मिसराही आवडला.