गझल

गझल

हे फुलांचे उधान झाडांना...

हे फुलांचे उधान झाडांना
एक उरले न पान झाडांना

थांबतो सावलीमधे कोणी
वाटतो हाच मान झाडांना

गूण हा त्या महान झाडांचा
खुटवती ते लहान झाडांना

ऐकती दूरच्या ऋतूंना ते
तीक्ष्ण असतात कान झाडांना

गझल: 

फिरून यायचे इथे टळेल का कधी?

तुझे तुलाच सत्य हे, कळेल का कधी?
फिरून यायचे इथे, टळेल का कधी?

खुशाल फेक रोज घाण त्यामधे नवी
अखंड वाहता झरा मळेल का कधी?

नभाहुनी धराच ज्यास्त ओढ लावते
म्हणून पान कोवळे गळेल का कधी?

गझल: 

मला सांभाळले आहे..

=========================

कसे घर बांधता येते तुला ह्रदयात हातांनी ?
तुला नक्कीच आहे घडवले निष्णात हातांनी !

कशाला आंधळा हा चाचपडतो रोज तार्‍यांना ?
कदाचित वाचता येते तयाला रात हातांनी

गझल: 

गात येथे तू उगा का थांबलेला

गात येथे तू उगा का थांबलेला
वाहवा तो करुन मारा पेंगलेला !

जाउ दे त्याला किती उंचावरीही -
दोर आम्ही नीट त्याचा कापलेला

तोंड भरुनी मानलेला जो सलोखा
पाठ फिरताना गळा का दाबलेला ?

गझल: 

मी तुझा,तुझा असेन आमरण

संशया करु नकोस आक्रमण
मी तुझा,तुझा असेन आमरण

सांगतो मनास, ”विसरलो तुला”
हीच तर तुझी मुळात आठवण

फ़ुंकणे,पिणे असभ्य वाटले
आजकाल हेच सभ्य आचरण

हासण्यास माझिया फ़सू नका
हासणे मुखावरील आवरण

गझल: 

आले वादळ गेले वादळ...

आले वादळ गेले वादळ कसे न मिटले
आठवणींच्या वाळूवरचे ठसे न मिटले

अंतरातला कोलाहल मी आत कोंडला
या माझ्या पण ओठावरचे हसे न मिटले

जिंकुन गेले दुर्दैवच ती कासव शर्यत

गझल: 

गझल

निरोपाच्या क्षणी डोळ्यात पाणी दाटले होते
मला माझ्याच अश्रूंनी असे गोंजारले होते

वसंता आजही नाही तुला जमले तसे फुलणे
फुले वेचायला जाताच काटे बोचले होते

जमेला घेत गेलो जी सुखाची वाटली नाती

गझल: 

कशासाठी कुणासाठी...

कशासाठी कुणासाठी झुरायाचे उगा आता
सुगंधाच्या पुन्हा पाठी पळायाचे उगा आता

धरायाची उन्हे हाती कुणाच्या हासण्यासाठी
कुणाला सावली देण्या जळायाचे उगा आता

अता ना तो ऋतू वेडा न वेड्या चांदण्या तैशा

गझल: 

Pages