गात येथे तू उगा का थांबलेला

गात येथे तू उगा का थांबलेला
वाहवा तो करुन मारा पेंगलेला !

जाउ दे त्याला किती उंचावरीही -
दोर आम्ही नीट त्याचा कापलेला

तोंड भरुनी मानलेला जो सलोखा
पाठ फिरताना गळा का दाबलेला ?

काल माशी ना उठे नाकावरीची -
आज मिरवी शूर नेता गाजलेला !

शांतिचा नारा घुमे दाही दिशांना
नेम तो जनतेवरी का रोखलेला ?

गझल: