गझल
गझल
उद्दाम
Posted by पुलस्ति on Sunday, 13 May 2007मी झाडांसम फुलणारा
Posted by संतोष कुलकर्णी on Saturday, 12 May 2007राजसा
Posted by नितीन on Wednesday, 9 May 2007जाहलो मी का असा?
सांग ना रे राजसा
मुलाहिजा
Posted by चित्तरंजन भट on Monday, 7 May 2007जगास काय! ते करीलही मुलाहिजा
मना, सुनावशील तू खरी मला सजा!
जमायचे न एक हातचेच राखणे
(जमायच्या तशा मला कठीण बेरजा!)
किती किती जपून मी स्मरायचो तुला!
तरी सुगंध सारखे करायचे इजा!
जिथतिथे सुसज्ज स्वागतास वादळे
कशी चुकेल वाट? साथ द्यावया विजा!
किती स्वतःस जाळशील कापरापरी?
सुवास का निमूट व्हायचा कधी वजा!
अनोळखीच वाटतात सर्व चेहरे
जरा जपून आपल्या घरात जात जा!
कोणी
Posted by चित्तरंजन भट on Monday, 7 May 2007काळजाला पिसू नये कोणी
कुशल इतके पुसू नये कोणी
जीव घ्यावा खुशाल प्रेमाने
बोचकारू, डसू नये कोणी
कुंतलांशी असे न खेळावे
मग स्वत:शी हसू नये कोणी
ओठ नाजुक बरे, न दुमडावे
वर अबोला कसू नये कोणी
दे जरा मोकळीक अर्थाला
शब्द इतके कसू नये कोणी !
कोण समजूत घालणार अता?
(एवढेही रुसू नये कोणी)
सूर्य पाण्यामधे पहावा पण
काजव्यांना फसू नये कोणी
ओळखीचे असून गाव कसे
ओळखीचे दिसू नये कोणी?
मी नसावे तुझ्यासवे जेव्हा
मी असावे, असू नये कोणी
झेंडा
Posted by विसुनाना on Sunday, 6 May 2007गझल-आजही
Posted by अनंत ढवळे on Sunday, 6 May 2007पेटली ह्रदयात होळी आजही
घेरुनी आली उदासी आजही