'....राहू दे मला माझा !!'
Posted by प्रदीप कुलकर्णी on Saturday, 5 May 2007'....राहू दे मला माझा !!'
गझल:
तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा ? बदनाम झंझावात मी !
गझल
'....राहू दे मला माझा !!'
मी जसा भेटतो तसा आहे
मीच माझाच आरसा आहे
मौक्तिकांत शिंपला शोधू
नायकातही खला शोधू
कैक साल वाकलो नाही
वंद्य पावले, चला, शोधू
का जगास बोल लावावे ?
दोष का न आपला शोधू ?
खोल डोहसे तिचे डोळे
त्यात हरवल्या मला शोधू
सोडुनी जुनी भ्रमरवृत्ती
घट्ट प्रेमशृंखला शोधू
पैज अमृतातही जिंके
अशा शब्दआंचला शोधू
इंद्र होउनी उभा याचक
धाव, कवच-कुंडला शोधू
अनसुया, प्रियंवदा नसता
'भृंग', चल शकुंतला शोधू
रसायन
!