मी जसा भेटतो
मी जसा भेटतो तसा आहे
मीच माझाच आरसा आहेहोतसे राख जो जळे त्याची
काय आयुष्य कोळसा आहे ?आपुला दोष ना दिसे कोठे
हा तुझा दोष, माणसा, आहेमी पिढीजात सोसतो दु:खे
वेदनेचाच वारसा आहे"काय माझ्यात पाहिले तेव्हा ?"
(हा तुझा प्रश्नही कसा आहे!)
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 02/05/2007 - 18:14
Permalink
हा तुझा प्रश्नही कसा आहे!
मी जसा भेटतो तसा आहे
मीच माझाच आरसा आहे
वाव्वा! आधीच्या आवृत्तीत (ऑर्कुट प्रोफाइलवरील)खालची ओळ 'आतबाहेर आरसा आहे' अशी होती. तीही मस्त. अधिक प्रवाही वाटली.
"काय माझ्यात पाहिले तेव्हा ?"
(हा तुझा प्रश्नही कसा आहे!)
क्या बात है! सुंदर!! उत्तम लहजा.
कोळसाही चांगला. इतर दोन शेरही आवडले. पण फार सरळ, थेट वाटले.
अनंत ढवळे
बुध, 02/05/2007 - 21:13
Permalink
द्विगुण समानक ( binary equals )
काय माझ्यात पाहिले तेव्हा ?"
(हा तुझा प्रश्नही कसा आहे!)
........चांगला शेर आहे . या शेराची सूचकता उल्लेखनीय आहे.
मी पिढीजात सोसतो दु:खे
वेदनेचाच वारसा आहे
............या शेरात दु:ख आणि वेदना या द्विगुण समानकांचा प्रयोग केला आहे.एकंदर साफ सुथरी गझल !
मिलिंद फणसे
बुध, 02/05/2007 - 21:17
Permalink
वा
गझल आवडली.
मीच माझाच आरसा आहे
यातला एक 'च' टाळता आला तर अजून बहार येईल.
प्रसन्न शेंबेकर
बुध, 02/05/2007 - 23:10
Permalink
ह्यावर
ह्यावर खरोखर विचार केला पाहिजे. मीच माझाच च्या ऐवजी
मी मनाचाच आरसा आहे .. असं केलं तर ? कसं वाटतं ?
विसुनाना
गुरु, 03/05/2007 - 13:59
Permalink
छान!
उत्तम गझल आहे.
विसुनाना
गुरु, 03/05/2007 - 14:26
Permalink
अर्थ बदलून-
तुमची माफी मागून एक सुचवू का?- अर्थ साफ बदलेल याची कल्पना आहे.
मी जसा भासतो तसा आहे
मी तुझा फक्त आरसा आहे
पुन्हा एकदा माफी असावी.
चित्तरंजन भट
गुरु, 03/05/2007 - 14:32
Permalink
वाव्वा!
मी जसा भासतो तसा आहे
मी तुझा फक्त आरसा आहे
विसुनाना, तुमची आवृत्तीही आवडली!
प्रसन्न शेंबेकर
गुरु, 03/05/2007 - 15:05
Permalink
छान!अं ...
छान!
अं ... असंही म्हणता येईल
मी तुला भासतो तसा आहे
मी तुझा फक्त आरसा आहे
प्रणव सदाशिव काळे
शनि, 05/05/2007 - 11:35
Permalink
आवडली
गझल आवडली.
कुमार जावडेकर
शनि, 05/05/2007 - 16:09
Permalink
सुंदर
प्रसन्न,
गझल आवडली. अगदी साधे-शब्द, पण परिणामकारक आहे.
वारसा, माणसा विशेष आवडले.
- कुमार
माणिक जोशी
मंगळ, 08/05/2007 - 06:54
Permalink
मस्तच रे प्रसन्न !
सर्वच शेर आवडले !
खूप सहजता आहे लिखाणात.. मस्त गजल !
ह बा
शनि, 05/06/2010 - 16:28
Permalink
होतसे राख जो जळे त्याची काय
होतसे राख जो जळे त्याची
काय आयुष्य कोळसा आहे ?
झकास!!
कैलास गांधी
सोम, 19/07/2010 - 17:20
Permalink
मी पिढीजात सोसतो
मी पिढीजात सोसतो दु:खे
वेदनेचाच वारसा आहे
विशेष आवडले.
गंगाधर मुटे
सोम, 19/07/2010 - 21:07
Permalink
मी पिढीजात सोसतो
मी पिढीजात सोसतो दु:खे
वेदनेचाच वारसा आहे
'
"काय माझ्यात पाहिले तेव्हा ?"
(हा तुझा प्रश्नही कसा आहे!)
छान. आवडलेत.