मुलाहिजा

जगास काय! ते करीलही मुलाहिजा
मना, सुनावशील तू खरी मला सजा!

जमायचे न एक हातचेच राखणे
(जमायच्या तशा मला कठीण बेरजा!)

किती किती जपून मी स्मरायचो तुला!
तरी सुगंध सारखे करायचे इजा!

जिथतिथे सुसज्ज स्वागतास वादळे
कशी चुकेल वाट? साथ द्यावया विजा!

किती स्वतःस जाळशील कापरापरी?
सुवास का निमूट व्हायचा  कधी वजा!

अनोळखीच वाटतात सर्व चेहरे
जरा जपून आपल्या घरात जात जा!


गझल: 

प्रतिसाद

सगळेच पुन्हा इथे डकवावे लागतील.
वा! वा! चित्त! मान गये गुरु!
लगालगा.......................जाते ही!
लेहेजा काय, कल्पना काय, शब्द काय!
कुर्निसात! की दंडवत!? काय म्हणू?

गझल ठीक वाटली

पठडीबाहेरच्या कल्पनांचे स्वागत असो...! हे शेर खासच जमून आले आहेत...सहजता, गोटीबंदपणा पाहण्याजोगा.... !

जमायचे न एक हातचेच राखणे
(जमायच्या तशा मला कठीण बेरजा!)

किती किती जपून मी स्मरायचो तुला!
तरी सुगंध सारखे करायचे इजा!

जिथतिथे सुसज्ज स्वागतास वादळे
कशी चुकेल वाट? साथ द्यावया विजा!

अनोळखीच वाटतात सर्व चेहरे
जरा जपून आपल्या घरात जात जा!
सुरेख शेर...अप्रतिम...!

 

वा. सुंदर ग़ज़ल!सजा आवडली.

जमायचे न एक हातचेच राखणे
(जमायच्या तशा मला कठीण बेरजा!)
वा वा. हा शेर सर्वात जास्त आवडला.

किती किती जपून मी स्मरायचो तुला! आणि अनोळखीच वाटतात सर्व चेहरे
जरा जपून आपल्या घरात जात जा! हेही आवडले.

जिथतिथे सुसज्ज स्वागतास वादळे
कशी चुकेल वाट? साथ द्यावया विजा!
वा! मस्त
 

चित्त,
वा! गझल आवडली.
जमायचे न एक हातचेच राखणे
(जमायच्या तशा मला कठीण बेरजा!)-
 अप्रतिम!
मक्ताही आवडला. गुलजारचा -
आइना देखकर तसल्ली हुई
हमको इस घर में जानता हैं कोई - हा शेर आठवला.
- कुमार