आभाळ चांदण्यांचे...






आभाळ चांदण्यांचे सावरावे आता
हे पूर आसवांचे आवरावे आता


खोटेच चेहरे, खोटेच हास्य होते
वास्तव हे जगाला दाखवावे आता


मी घेतले न त्यांना पारखूनी तेंव्हा
ईमान काय त्यांचे आजमावे आता?


केलेस हाल तू माझे असे काही की
पाहून हे चिरेही पाझरावे आता!


गेले कुठेतरी 'जे' प्राण माझे होते
तेथे निरोप कैसे पाठवावे आता?


सोयीनुसार त्यांनी वार होते केले
मीही कुणा-कुणाला आठवावे आता?


मी पेटवेन ऐसी ज्योत या क्रांतीची
तारे हजार त्यांचे काजळावे आता...


-नितीन

गझल: 

प्रतिसाद

आभाळ चांदण्यांचे सावरावे आता
हे पूर आसवांचे आवरावे आता
मी पेटवेन ऐसी ज्योत या क्रांतीची
तारे हजार त्यांचे काजळावे आता...
मस्त! गझल आवडली. पुढच्या गझलेला शुभेच्छा! (पु.ग.शु.)
(अवांतरः शेराच्या दोन मिसर्‍यातले  अंतर कमी करण्यासाठी
उल्या मिसर्‍यानंतर "shift + Enter" एकदम दाबावे.म्हणजे एकच ओळ पुढे लिहिता येईल.)
 

अतिशय छान

सुनील

ईमान, वार, चिरे खासच..
-- पुलस्ति.

मतला आणि 'पाहून हे चिरेही पाझरावे आता!' ही ओळ विशेष आवडली. दोन ओळींतला संबंध काही ठिकाणी अधिक सुस्पष्ट व्हायला हवा, असे मला वाटते.
 

चित्तरंजन सर,
आपण जरा तपशीलात सांगीतले तर विचार करता येईल...
मित्रांनो, प्रतिसादांबद्दल आभार!
-नितीन

गेले कुठेतरी 'जे' प्राण माझे होते
तेथे निरोप कैसे पाठवावे आता?
आवडले. हे वृत्त वाचताना थोडी अडचण आली. ह्या वृत्तातील एखादी प्रसिद्ध ग़ज़ल, गीत सांगता येइइल का? म्हणजे गुणगुणणे सोपे होइइल.

काही कल्पना चांगल्या आहेत पण मीटरमधे गडबड आहे:
आभाळ चांदण्यांचे सावरावे आता
२ २ १   २ १  २  २ २ १ २ २  २ २

खोटेच चेहरे, खोटेच हास्य होते
२ २ १  २ १ २  २ २ १  २ १  २ २

प्रणव,
ह्या वृत्तातील ग़ज़ल, गीत मला माहीत नाही... :-(
समीरशी सहमत आहे.

छान. चित्तरंजनशी सहमत.
आपला,
(आस्वादक) धोंडोपंत

वा उत्तम आहे