मी झाडांसम फुलणारा


मी झाडांसम फुलणारा
वार्‍यासंगे डुलणाराझोपाळ्यावर स्वप्नांच्या
मी अव्याहत झुलणारा


अव्यक्ताचा आशय मी...
मी मौनातच खुलणारासौंदर्याचा ध्यास असे...
सत्यावर मी भुलणारामी गंधित गुलबाख, जणू...
सूर्यास्ताला फुलणारा--प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर.


 
गझल: 

प्रतिसाद

अव्यक्ताचा आशय मी...
मी मौनातच खुलणारा

छान कल्पना !  ...आपल्या गझललेखनाला माझ्या शुभेच्छा...!

अव्यक्ताचा आशय मी...
मी मौनातच खुलणारा
         सुंदर  शेर  आहे ...

सूर्यास्त आणि अव्यक्त शेर खूपच आवडले!
-- पुलस्ति.

झोपाळ्यावर स्वप्नांच्या
मी अव्याहत झुलणारा
वा!

अव्यक्ताचा आशय मी...
मी मौनातच खुलणारा
वा!वा!

गझल आवडली.
 

गझल आवडली,
गुलबाख या शब्दाचा अर्थ कुणी सांगाल का? 

गझल आवडली.
पण 'गुलखाब'??

सर्व ओळी सुंदर आहेत.
अव्यक्ताचा आशय मी...
मी मौनातच खुलणारा
हा शेर सर्वाधिक आवडला.

संतोष कुलकर्णी म्हणतात ते फूल बहुधा गुलबक्षीचे असावे, असा अंदाज आहे...हे फूल संध्याकाळी उमलते.(पण ते सुगंधी असते का...? नसते बहुधा !). या फुलाचे रंग राणी, पांढरे, पिवळसर  (कधी कधी मिश्ररंगीही ) असे असतात. आणखीही असतील रंग़, पण माझ्या पाहण्यात नाहीत. दांडी नाजूक आणि काहीशी लांब असते. फुलाचा आकार गोल आणि साधारणपणे जुन्या काळातील कर्णफुलांसारखा (एक दागिना !) असतो. रुपयाच्या नाण्यापेक्षा थोडासा लहान असा त्याचा आकार असतो. हे फूल झुडपावर फुलते. याचे उंच झाड नसते....( श्री. कुलकर्णी  यांना गुलबक्षीच अभिप्रेत असेल, तरच मी वर दिलेले वर्णन लागू पडेल...!  याच फुलाला गुलबास असेही म्हणतात...कदाचित मराठवाड्याकडे गुलबाख म्हणतही असावेत...)

धन्यवाद!
श्री. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितलेला अर्थ अगदी बरोबर आहे. आमच्याकडे हे फूल गुलाबी रंगातही येते. त्याला  ग्रामीण भाषेत 'गुलबाख' असेही म्हणतात. दुसरे म्हणजे, हे फूल सुगंधीही असते. मात्र, त्याचा सुवास अगदी जवळ जावून (त्याचा विश्वास संपादन केल्यास ?) घेतल्यास येतो. तो फार पसरत नाही. मला त्याचा संध्याकाळी उमलण्याचा स्वभाव फार आवडतो.
पुनश्च धन्यवाद!
संतोष

धन्यवाद!पुनश्च धन्यवाद!