गझल

गझल

ठेवला दडपून ज्यांनी...

ठेवला दडपून ज्यांनी नेमका इतिहास माझा
आज त्यांच्या संस्कृतीला होत आहे त्रास माझा

लाभले नाही  महाली सौख्य ज्यांच्या जीवनाला
वाटतो त्यांना सुखाचा मलमली वनवास माझा

लोक ते आता नव्याने लागले बहरावयाला
लाभला ग्रीष्मात ज्यांना श्रावणी सहवास माझा

देह माझा तडफडाया लागतो जेव्हा भुकेने
वाटते सार्‍या जगाला हा असे उपवास माझा

हे कसे स्वातंत्र्य आता लागले मजला छळाया
केवढा रमणीय होता धुंद कारावास माझा

गझल: 

गर्दी...


जिथे बघावे तिथे माणसांची गर्दी
श्रीमंतांची, गोरगरीबांची गर्दी...


वेगवेगळा प्रत्येकाचा देव इथे
सदैव असते कशी उत्सवांची गर्दी?...


महाभारताहून निराळे कलियुग हे
पांडव नसतानाच कौरवांची गर्दी...


नव्हेत साधीसुधी माणसे ही सगळी
आहे ही ईश्वर बनणार्‍यांची गर्दी...


रोज नव्याने जगतो जीवन 'अजब' असे
रोज भेटते नव्या संकटांची गर्दी...

गझल: 

रंज की जब गुफ्तगू होने लगी.. मराठी अविष्करण.

ओठांवरती ओठ टेकता क्षणात कळते
कसे बोलते मुक्यामुक्याने सुख सुखाशी

गझल: 

कुणीच नव्हते आले निरोप देण्यासाठी ...

आई जेंव्हा जाता जाता रडली होती
काही  पाने वार्‍यावर  थरथरली होती

पुढ्यात होता आयुष्याचा उजाड वाडा
माझी छाया खिन्न मनाने बसली होती

वर्षांमागुन वर्षे विचार करतो आहे
चूक कुणाची , कशी कुठे ती घडली होती

अवती भवती जंगल होते नात्यांचे पण
जगण्यासाठी एक डहाळी पुरली होती

कुणीच नव्हते आले निरोप देण्यासाठी
माझ्यामागे धूळ जराशी उडली होती....

अनंत ढवळे..

 

 

 

 

गझल: 

तुला या शोधती तारा

तुला या शोधती तारा
तुझ्यासाठी झुरे वारा


पुन्हा वेडावला वारा
थबकला गंध जाणारा


नको जाऊ अशा रात्री
अरे, तू एकटा तारा


दिले धोके उजेडाने
पुसू या वाट अंधारा        

मला ना पेलवे आता
व्यथांचा कोण डोलारा!


      दिलीप पांढरपट्टे

गझल: 

Pages