कमाई....
आयुष्याची तूच कमाई..
बाकी दुसरे काही नाही...
याच्यानंतर जेव्हा भेटू..
अपुल्याबद्दल बोलू काही..
तुला पाहिजे तसा वागतो...
म्हणून माझी किंमत नाही...
तोंडावरती गोड बोलतो..
पण माघारी सुरू लढाई..
जेव्हा आपण खोटे पडतो..
देतो त्यावर किती सफाई....
असे बोलतो आपण दोघे..
जसे आपले काही नाही...
तूच बोलली मला स्वतःहुन..
मनात माझ्या नव्हते काही..
नंतर बसतो घंटोघंटे..
आधी करतो उगीच घाई..
..........अभिषेक उदावंत.
अभिषेक उदावंत.
"संवेदना रायटर्स कम्बाईन." अकोला 444001.
मो. नं. : 9922646044.
गझल:
प्रतिसाद
नितीन
रवि, 16/12/2007 - 20:53
Permalink
तोंडावरती गोड बोलतो..
१) तोंडावरती गोड बोलतो..
पण माघारी सुरू लढाई..
२) नंतर बसतो घंटोघंटे..
आधी करतो उगीच घाई..
आवडले...
अभिषेक उदावंत
शनि, 22/12/2007 - 19:19
Permalink
आभार
"प्रतिसाबद्द्ल मनापासुन आभार"...
धन्यवाद.....!!!