रंज की जब गुफ्तगू होने लगी.. मराठी अविष्करण.

रंज की जब गुफ्तगू होने लगी... ही गजल ऐकली होतीच. आता 'नवे ले़़ख' या सदरातून हा विषय अचानक समोर आला. दोन चार दिवस रंजच डोक्यात होती.. याच अनुरोधाने काही बरे वाईट लिहिले आहे... मनमोकळे अभिप्राय, सुचना, सुधारणा  अपेक्षित...


रंज की जब गुफ्तगू होने लगी.. मराठी अविष्करण.


सरले अंतर, वाढे जवळीक जराजराशी
तुझ्या वेदना जेव्हा धरल्या मीच उराशी


'आपण', 'तुम्ही'’न कळताना झाले 'तू', 'मी'’
दुःखाच्या गुजगोष्टी होता परस्परांशी


उपचाराची हवी कशाला हातमिळवणी
भेटू तेव्हा धरेन तुजला मी हृदयाशी


वणवा होउन अता न जळते दुःख रातीला
तेवत असते दिव्यासारखे मंद उशाशी


ओठांवरती ओठ टेकता क्षणात कळते
कसे बोलते मुक्यामुक्याने सुख सुखाशी


--अविनाश ओगले

गझल: 

प्रतिसाद

अविनाशराव,
मला तुमची ही रचना स्वतंत्र  म्हणून फारच आवडली...
उपचाराची हवी कशाला हातमिळवणी
भेटू तेव्हा धरेन तुजला मी हृदयाशी
वणवा होउन अता न जळते दुःख रातीला
तेवत असते दिव्यासारखे मंद उशाशी
या  द्विपदी उत्तम झाल्या आहेत.  शुभेच्छा.
हे  रंज की... चे मराठी आविष्करण आहे की नाही, कुणास ठाऊक...!!!

सहमत आहे मी...
-मानस६

वा वा पंत,
गझल आवडली. 
उपचाराची हवी कशाला हातमिळवणी
भेटू तेव्हा धरेन तुजला मी हृदयाशी
वणवा होउन अता न जळते दुःख रातीला
तेवत असते दिव्यासारखे मंद उशाशी
वा वा. क्या बात है!
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com