सोपे नसते
Posted by सतीश on Wednesday, 14 November 2007श्री. कुमार यांनी लिहिलेली 'सोपे नसते' हा रदीफ असलेली एक सुंदर गझल वाचण्यात आली होती. तोच रदीफ घेऊन मीही लिहिलेलं इथे देत आहे.
कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले !
ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?
गझल
श्री. कुमार यांनी लिहिलेली 'सोपे नसते' हा रदीफ असलेली एक सुंदर गझल वाचण्यात आली होती. तोच रदीफ घेऊन मीही लिहिलेलं इथे देत आहे.
तिला मी भेटतो आहे पुन्हा... रोखा मला...
कितीदा देत आहे मी असा धोका मला...
दिगंताहूनही मी दूर गेलो एवढा..
जराही शक्य नाही ऐकणे हाका मला..
दिली संधी तरीही बोलली नाहीस तू..
अता मागू नको तू एकही मोका मला..
नकोसे वाटते आता तिचे मज नावही..
नकोसा काळजाचा त्यामुळे ठोका मला..
किनारा तू नकोरे दाखवू मज सागरा..
किनारी न्यायची नाही कधी नौका मला..
सर्व रसिकांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, माझी खालील 'कुर्निसात' ही गझल पुढील वर्षी अमेरिकेत होणा-या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनातील सादरीकरणासाठी निवडण्यात आलेली आहे.
तिला मी भेटतो आहे पुन्हा... रोका मला...
कितीदा देत आहे मी असा धोका मला...
क्षितीजाहूनही मी दूर गेलो एवढा..
जराही शक्य नाही ऐकणे हाका मला..
दिली संधी तरीही बोलली नाहीस तू..
अता मागू नको तू एकही मौका मला..
नकोसे वाटते आता तिचे मज नावही..
नकोसा काळजाचा त्यामुळे ठोका मला..
किनारा तू नकोरे दाखवू मज सागरा..
तिरावर न्यायची नाही कधी नौका मला..
एक प्रार्थना ओठांमधुनी निघत राहिली
काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली
कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली
जुन्या ऋतूंची साद घेउनी पाउस आला
गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली
कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ
त्या दु:खाची गाज दूरवर घुमत राहिली
फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मास वर्षांची शकले पडत राहिली.........
एकटेपण मागता का?
अन स्वतःला टाळता का?
हरवलेला सूर्य शोधा
चांदण्या कुरवाळता का?
"झूठ आहे सर्वकाही"
झूठ हेही मानता का?
मार्ग चुकला! व्यर्थ आता
या दिव्याला राखता का?
जा बघ्यांनो, हा तमाशा -
संपला; रेंगाळता का?