फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा.......
एक प्रार्थना ओठांमधुनी निघत राहिली
काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली
कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली
जुन्या ऋतूंची साद घेउनी पाउस आला
गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली
कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ
त्या दु:खाची गाज दूरवर घुमत राहिली
फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मास वर्षांची शकले पडत राहिली.........
गझल:
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
शुक्र, 02/11/2007 - 21:15
Permalink
सुरेख...!
एक प्रार्थना ओठांमधुनी निघत राहिली
काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली ... वा...वा...
कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली... सुरेख...सुरेख !
चित्तरंजन भट
शुक्र, 02/11/2007 - 22:24
Permalink
अतिशय सुरेख
[quote=अनंत ढवळे]
कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली
फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मास वर्षांची शकले पडत राहिली.........
[/quote]
अतिशय सुरेख गझल. वरील २ शेर तर कायम लक्षात राहणारे आहेत.
चक्रपाणि
शुक्र, 02/11/2007 - 22:54
Permalink
छान
जुन्या ऋतूंची साद घेउनी पाउस आला
गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली
फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मास वर्षांची शकले पडत राहिली.........
मस्त!
- चक्रपाणि जीवन चिटणीस
अमित वाघ
शुक्र, 02/11/2007 - 23:08
Permalink
छान गझल...
कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली
जुन्या ऋतूंची साद घेउनी पाउस आला
गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली
छानच.................
प्रमोद बेजकर
शुक्र, 02/11/2007 - 23:12
Permalink
आवडली
सरोवर, पाऊस, आणि काचांचे शेर मस्तच.
संतोष कुलकर्णी
शनि, 03/11/2007 - 16:15
Permalink
सुंदर
अतिशय मनोज्ञ, गूढ, सशक्त गझल. अनंत ढवळे या नावाला शोभणारी....
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
समीर चव्हाण (not verified)
सोम, 05/11/2007 - 15:25
Permalink
काय बोलू
कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ
त्या दु:खाची गाज दूरवर घुमत राहिली
मिल्या
सोम, 05/11/2007 - 18:09
Permalink
वा!!! सुरेख
गजलकट्टा च्या एका कार्यक्रमात ऐकली होतीच.. आज पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला..
मस्तच आहे एकदम
पुलस्ति
सोम, 05/11/2007 - 20:04
Permalink
वा!
गझल खूप आवडली!
पाऊस, सरोवर आणि काचा शेर विशेष आवडले!!
-- पुलस्ति.
धोंडोपंत
शुक्र, 09/11/2007 - 18:28
Permalink
वा वा
वा वा !!!
छान गझल. नादमधुर. सर्व शेर आवडले.
फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मास वर्षांची शकले पडत राहिली.........
केवळ अप्रतिम.
आपला,
(उद्ध्वस्त) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
जनार्दन केशव म्...
बुध, 05/12/2007 - 18:50
Permalink
गाज घुमत राहिली...
अनंतदा,
कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ
त्या दु:खाची गाज दूरवर घुमत राहिली
बस्स... इतकेच..
अजून काय बोलू...
जनार्दन केशव म्...
बुध, 05/12/2007 - 18:52
Permalink
गाज घुमत राहिली...
अनंतदा,
कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ
त्या दु:खाची गाज दूरवर घुमत राहिली
बस्स.. इतकेच...
अजून काय बोलू.....
अजब
शुक्र, 07/12/2007 - 15:47
Permalink
वा!
कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली
फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मास वर्षांची शकले पडत राहिली... विशेष आवडले.
अजब
अजब
शुक्र, 07/12/2007 - 15:48
Permalink
वा!
कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली
फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मास वर्षांची शकले पडत राहिली
अजब
विसुनाना
सोम, 10/12/2007 - 16:51
Permalink
वा! वा! वा!
तिन्हीसांजेच्या वासाची मजबूत गझल.
डोकं हल्लक झालं. अजून येऊ द्या...
चांदणी लाड.
सोम, 18/05/2009 - 13:03
Permalink
काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली
मानले तुम्हांला....काय गझल आहे..!! सही..
एक प्रार्थना ओठांमधुनी निघत राहिली
काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली
कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली
जुन्या ऋतूंची साद घेउनी पाउस आला
गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली
कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ
त्या दु:खाची गाज दूरवर घुमत राहिली
अहाहा..!! शब्द नाहित पुरेसे सांगायला.. पण मनाला भावली गझल.
प्रसन्न शेंबेकर
मंगळ, 19/05/2009 - 14:06
Permalink
कुणा न
कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ
त्या दु:खाची गाज दूरवर घुमत राहिली
ह्या ओळींना माझा सलाम !!
प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"
क्रान्ति
बुध, 20/05/2009 - 08:49
Permalink
!!!!!!!!!
शब्द नाहीत! कमाल आहे गझल! सगळेच शेर लाजवाब.
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}