गझल

गझल

झुलवा

रात्रीला स्वप्नाने सजवा
स्वप्नाला अश्रूंनी घडवा


त्यांची दु:खे जेथे पिकती
तेथे तुमची कळकळ जिरवा


त्याच उड्या अन त्याच कसरती
खेळ संपता - तंबू हलवा...


नसे जाणता राजा आता
कशास कोणी खिंडी लढवा?


नेता म्हणतो, "सूर्य लपवला -
(जयद्रथांना खुशाल उडवा!)"


धर्म, राजसत्ता अन आम्ही
युगायुगांचा चालू झुलवा...

गझल: 

कळेल का कुणा ॠणानुबंध...

कळेल का कुणा ॠणानुबंध आपुले कसे
असून सावलीत मी उन्हात बैसले कसे


दवात न्हात राहिले, दवात गात राहिले
झुल्यावरी फुलांपरी मनात डवरले कसे


कपोल गाल, ओठ लाल लाजता उषेपरी
गुलाब गंध प्राशुनी ह्रदय गुलाबले कसे


सुगंध गंध पल्लवीत श्वास्-श्वास गंधता
इथे-तिथे तुझेच सांज रंग उधळले कसे


सखाही तूच, तूच मित्र, तूच जिवलगा तरी
कशास मज विचारता, अखेर भाळले कसे


-  दीपा

गझल: 

अभिप्रेत : अमोल शिरसाट

याद माझी येत नाही हे ख्ररे का?
त्रास थोडा देत नाही हे खरे का ?


तू निघावे अन् तुला मी  थांबवावे 
हे तुला अभिप्रेत नाही हे खरे का ?


जाळते आहे जिवाला खूप जी,...ती
वेदना गझलेत नाही हे खरे का ?


खूप आहे आज पैसा ...पण मनाला
तो दिलासा देत नाही हे खरे का ?

गझल: 

पाप

 


         मला एवढे पाप करु द्या शेवटचे


         जमले ना अद्याप करु द्या शेवटचे


                नाटक आहे तिसरा अंक जगण्याचे


                होई आपोआप करु द्या शेवटचे


         धाडस म्हणता लढण्यालाच एकाकी?


         जगू द्यात संताप करू द्या शेवटचे


                 नाही राहिले गाणे तुमच्यासाठी


                 आतआत आलाप करु द्या शेवटचे


         तिलाही अवघड नाही निरोप घेणे


         नकोच आता ताप करु द्या शेवटचे 

गझल: 

संगतीला संगतीचा...


                           संगतीला संगतीचा...      

                   संगतीला संगतीचा, दोष हा जडला कसा?
                   स्पर्श मी करता गुलाबा, हा असा सुकला कसा?

                   वेदना माझ्या उरीची,आज त्याने ऐकता;
                   तो जरी पाषाण होता; येवढा रडला कसा?

                   चालतो मी वाट काटेरी, कधीची आज पण,
                   देखणा रस्ता फुलांचा, मजकडे वळला कसा?

                   पुत्र सूर्याचा,वीरोत्तम,क्षात्र धर्मी कर्ण तो;
                   द्रौपदीची लाज जाता, गप्प रे बसला कसा?

गझल: 

भेटण्याचे राहिले

जीवनाशी  भेटण्याचे राहिले
बंध अमुचे बांधण्याचे राहिले

पावसाळे यायचे अन जायचे
गीत माझे पेरण्याचे राहिले

ती  व्यथांना माझिया सोसायची
दु:ख माझे पाहण्याचे राहिले

हरवलो तुमच्यामधे मी  येवढा
मी स्वत:ला  शोधण्याचे राहिले

मी  सदा हसणार होतो जीवनी
आसवांचे थांबण्याचे राहिले


 



 

गझल: 

कुणी न समजुन घेतला...

कुणी न समजुन घेतला तुझा विचार बाबा
अजून घडती इथे... नको ते प्रकार बाबा


समता, ममता, न्याय, बंधुता वचने तुमची
स्वार्थापोटी... होते त्यांची शिकार बाबा


सत्तेची ही भ्रांत कुणा जाणवते तेव्हा...
प्रतिमेवरती होतो.. 'फसवा' प्रहार बाबा


तुझी सावली दूर अशी का अमुच्यापासुन
अजून अमुची टळली नाही.. दुपार बाबा


शिका, संघटित व्हा, संघर्ष करा तुम्ही रे
सांगितले तू.. आम्हीच मात्र चुकार बाबा

गझल: 

हा चराया

  मुक्तकः


यातनांना कोण सांगा साद घाली
मी सुखाने कंटकांचा वेश ल्याला


---

हा चराया दांडग्यांना देश झाला
भोग घ्याया लांडग्यांना पेश झाला


चांदण्याचा स्पर्श माझ्या अंगणाला
तेवढ्यानेही तयांना क्लेश झाला


भार म्हणता मी उद्याला आज मेलो
हा उद्याला आजचा संदेश झाला


साथ झाली बांधवांची आजवरती
प्यार तरीही शेवटी परदेश झाला


धीर केला एकदा मी पेटण्याचा
शांत विझण्याचा मला उपदेश झाला   


 


 


 


 


 

गझल: 

Pages