कुणी न समजुन घेतला...

कुणी न समजुन घेतला तुझा विचार बाबा
अजून घडती इथे... नको ते प्रकार बाबा


समता, ममता, न्याय, बंधुता वचने तुमची
स्वार्थापोटी... होते त्यांची शिकार बाबा


सत्तेची ही भ्रांत कुणा जाणवते तेव्हा...
प्रतिमेवरती होतो.. 'फसवा' प्रहार बाबा


तुझी सावली दूर अशी का अमुच्यापासुन
अजून अमुची टळली नाही.. दुपार बाबा


शिका, संघटित व्हा, संघर्ष करा तुम्ही रे
सांगितले तू.. आम्हीच मात्र चुकार बाबा


विचार श्रीमंती दिलीस तू ...'सिद्धार्थाची'
तुझ्या शिकवणीवरी.. आमची मदार बाबा


 - जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

बाबासाहेबांना अर्थपुर्ण श्रद्धांजली वाहिलीत्..मस्तच

-मानस६

गझल आवडली.....