झुलवा
रात्रीला स्वप्नाने सजवा
स्वप्नाला अश्रूंनी घडवा
त्यांची दु:खे जेथे पिकती
तेथे तुमची कळकळ जिरवा
त्याच उड्या अन त्याच कसरती
खेळ संपता - तंबू हलवा...
नसे जाणता राजा आता
कशास कोणी खिंडी लढवा?
नेता म्हणतो, "सूर्य लपवला -
(जयद्रथांना खुशाल उडवा!)"
धर्म, राजसत्ता अन आम्ही
युगायुगांचा चालू झुलवा...
गझल:
प्रतिसाद
केशवसुमार
शुक्र, 18/01/2008 - 04:21
Permalink
वा
पुलस्तिशेठ,
धर्म, राजसत्ता अन आम्ही
युगायुगांचा चालू झुलवा... सुंदर
गझल आवडली..
नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा
केशवसुमार
( नंतर गझलेत बदल केलेले दिसतात)
जयन्ता५२
शुक्र, 18/01/2008 - 16:15
Permalink
वा!
पुलस्ति,
मतला,तंबू,खिंड हे शेर मस्त!
"जयद्रथ" च्या शेराचा नेमका अर्थ उमजला नाही.
जयन्ता५२
चित्तरंजन भट
सोम, 21/01/2008 - 20:14
Permalink
वा!
एकंदर सगळी गझल आवडली. आणि त्यातला
त्याच उड्या अन त्याच कसरती
खेळ संपता - तंबू हलवा...
हा शेर फार आवडला.
त्यांची दु:खे जेथे पिकती
तेथे तुमची कळकळ जिरवा
ह्या शेरातली ओळ जेथे जेथे दु:खे पिकती असाही वाचून बघितला.
प्रदीप कुलकर्णी
शुक्र, 25/01/2008 - 23:52
Permalink
वा...वा...वा...!!!
रात्रीला स्वप्नाने सजवा
स्वप्नाला अश्रूंनी घडवावा...
वा...वा...वा...!!!
मला वाटते, तुम्ही दुसरा व तिसरा असे दोन शेर नंतर बदललेले दिसतात. मात्र, आधीचेच शेर मला जास्त आवडले होते.
पुलस्ति
मंगळ, 29/01/2008 - 22:46
Permalink
जयद्रथ
हे मला प्राचीन व अर्वाचीन राजकारणाचे जाणवलेले एक व्यवच्छेदक लक्षण आहे.
नेता = तत्कालीन यशस्वी राजकारणी
सूर्य = हे नेहेमीप्रमाणे "चांगल्या" चे प्रतीक - सद्सद्विवेकबुद्धी, कायदा, न्याय इ.इ.
जयद्रथ = "नेत्याने निवडलेल्या वाईटा" चे प्रतीक. हे वाईट नाही असे म्हणणे नाही, पण ते निवडलेले (targetted) आहे हा मुद्दा जास्त महत्वाचा.
मला अधोरेखित करायची आहे - निवडलेल्या वाईटाला संपवण्याची पद्धत. येथे तुम्ही बुश्-इराक घाला, गुजरात घाला...यापुढचा विचार वाचकाला करायचा आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद जयंतराव.
-- पुलस्ति.
चक्रपाणि
बुध, 30/01/2008 - 14:19
Permalink
तंबू-कसरती
त्याच उड्या अन त्याच कसरती
खेळ संपता - तंबू हलवा...
वावा! हा शेर सगळ्यात जास्त आवडला.
गझल चांगली आहे. आवडली. जयद्रथाचा शेर प्रथम वाचनात मलाही नीटसा कळला नाही. तुम्ही अर्थ सांगितल्यावर आता अजूनही विचार करतो आहे :)
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस