हा चराया

  मुक्तकः


यातनांना कोण सांगा साद घाली
मी सुखाने कंटकांचा वेश ल्याला


---

हा चराया दांडग्यांना देश झाला
भोग घ्याया लांडग्यांना पेश झाला


चांदण्याचा स्पर्श माझ्या अंगणाला
तेवढ्यानेही तयांना क्लेश झाला


भार म्हणता मी उद्याला आज मेलो
हा उद्याला आजचा संदेश झाला


साथ झाली बांधवांची आजवरती
प्यार तरीही शेवटी परदेश झाला


धीर केला एकदा मी पेटण्याचा
शांत विझण्याचा मला उपदेश झाला   


 


 


 


 


 

गझल: