गझल

गझल

तू

या संकेतस्थळावर पहिल्यांदाच गझल टाकण्याचं धाडस करतेय. गुरुजींनी सांभाळून घावं :)

तू

तुझे स्वप्न माझ्याच स्वप्नात होते
तसे सोबतीच्या करारात होते

नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा
तुझ्या मुक्त केसातही रात होते

पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला
तुझे दाद देणे अकस्मात होते

नसावे नशीबात घायाळ होणे
तुझे तीर सारे पहा-यात होते

निशेला न ऐसेच वैराग्य आले
तुझे चांदणे ऐन बहरात होते

जयश्री

गझल: 

माझी सावलीही रंगली...

कान्हा,पुरे,सारी पहा मी रंगली
माझी,अरे,बघ सावलीही रंगली!

मिळतात कोठे रंग हे गहिरे तुला?
आत्म्यासवे ज्यांनी तनू ही रंगली!

हे भाळ,ते आभाळ, झाले रे निळे
गोकुळ निळे,यमुना निळी ती रंगली!

गझल: 

Pages