तू

या संकेतस्थळावर पहिल्यांदाच गझल टाकण्याचं धाडस करतेय. गुरुजींनी सांभाळून घावं :)

तू

तुझे स्वप्न माझ्याच स्वप्नात होते
तसे सोबतीच्या करारात होते

नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा
तुझ्या मुक्त केसातही रात होते

पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला
तुझे दाद देणे अकस्मात होते

नसावे नशीबात घायाळ होणे
तुझे तीर सारे पहा-यात होते

निशेला न ऐसेच वैराग्य आले
तुझे चांदणे ऐन बहरात होते

जयश्री

गझल: 

प्रतिसाद

दुसरा,तिसरा,चवथा शेर अतिशय सुन्दर ........
                        शुभचिन्तक

छान...  शेर आवडला
नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा
तुझ्या मुक्त केसातही रात होते

अकस्मात आणि पहार्‍यात आवडले.
तुझे तीर सारे पहा-यात होते       वा.
तुझ्या मुक्त केसातही रात होते   हे सुद्धा छान.
पण पहिल्या ओळीची तीव्रता कमी पडते आहे असे वाटते.
कलोअ चूभूद्याघ्या

खूपच छान!

तुझे स्वप्न माझ्याच स्वप्नात होते
तसे सोबतीच्या करारात होते

ध्वनिमुद्रिका आपण काढणार होतात होय?? (हलकेच घ्या) (कृपया विश्वस्तांनी न-बोचर्‍या विनोदांना परवानगी द्यावी).

नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा
तुझ्या मुक्त केसातही रात होते

पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला
तुझे दाद देणे अकस्मात होते

व्वा!