दूर

गेलात दूर तुम्ही आकाश शोधण्याला
आणीक दूर झाली भूमी अता तुम्हाला!

झालां गरूड तुम्ही घेऊन पंख त्याचे
घरट्यास आसर्याला जागा नसे तुम्हाला!

हनुमंत होउनीही रवि आणण्यास गेला
परतून ना कधीही प्रभु भेटला तुम्हाला!

विझलात आसमंती जळुनी उगा फुकाचे
ज्योतीसवे न केव्हा गणले कुणी तुम्हाला!

गेलात दूर तुम्ही अमुच्या मनातुनीही
इथल्या जगात आता थारा नसे तुम्हाला!

गझल: 

प्रतिसाद

छान.......
विझलात आसमंती जळुनी उगा फुकाचे
ज्योतीसवे न केव्हा गणले कुणी तुम्हाला!

प्रत्येक शेरातील आशय छानच. गरूड, हनुमंत, ज्योत हे तर अफलातून. आता मांडणीकडेही लक्ष असू दे.
कलोअ चूभूद्याघ्या

माझ्या पहिल्या गझ़लला मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!

आपल्या गझलेतील आशय आश्वासक आहे ! लिखाणास शुभेच्छा !

धन्यवाद!