ही झाडे पेटवली कोणी.......
ही झाडे पेटवली कोणी
अनाथ केले पक्शी कोणी
तळ डोहाचा निरखत होतो
गढूळ केले पाणी कोणी
कुणी अशी माकडे निवडली
दिली तया॑ना पोथी कोणी
तो हिटलर आहे तर राहो
मीही नाही गा॑धी कोणी
ज्यावर होते आग्यामोहळ
फा॑दी तीच झटकली कोणी
मला सारखे जाणवते हे
आहे माझ्या पाठी कोणी
असला तर माझ्यातच आहे
माझा मोठा वैरी कोणी
तो मातीवर उतरत नाही
हवा एवढी भरली कोणी
विणू लागला आहे जाळे
देही आला कोळी कोणी...
- वैभव देशमुख
गझल:
प्रतिसाद
रसिक (not verified)
शनि, 07/03/2009 - 05:31
Permalink
वा वा
चांगली गझल केलीस......... आगे बढो.
अनंत ढवळे
शनि, 07/03/2009 - 12:45
Permalink
मला सारखे
मला सारखे जाणवते हे
आहे माझ्या पाठी कोणी
असला तर माझ्यातच आहे
माझा मोठा वैरी कोणी
विणू लागला आहे जाळे
देही आला कोळी कोणी...
सुंदर शेर !!
दशरथयादव
शनि, 07/03/2009 - 14:53
Permalink
शेर
शेर आवडला......
तो मातीवर उतरत नाही
हवा एवढी भरली कोणी
अजय अनंत जोशी
शुक्र, 13/03/2009 - 20:37
Permalink
व्वा!
तो मातीवर उतरत नाही
हवा एवढी भरली कोणी
..... वास्तवदर्शी शेर
कलोअ चूभूद्याघ्या
शुभचिन्तक (not verified)
शनि, 14/03/2009 - 05:05
Permalink
कुणी अशी
कुणी अशी माकडे निवडली
दिली तया॑ना पोथी कोणी
तो हिटलर आहे तर राहो
मीही नाही गा॑धी कोणी
हे दोन शेर समवि़श्ट केल्यामुळे गझलेचा दर्जा ढासाळ्ला आहे.
हे शेर परम्परगत विद्रोही विचारसरणीचे आहेत.
बाकी शेर चान्गलेंअविन लिहिण्याचा प्रयत्न करवा............
शुभचिन्तक.
चित्तरंजन भट
शनि, 14/03/2009 - 13:52
Permalink
टोकदार
चांगली टोकदार रचना. सगळे शेर आवडले.
रवि केसकर (not verified)
शुक्र, 03/04/2009 - 20:37
Permalink
वा कया बात
वा कया बात है
आनंदयात्री
शुक्र, 10/04/2009 - 13:30
Permalink
ही
ही स्वरयमकाची गझल आहे ना?
जाणकारांनी मार्गदर्शन करावे...
असला तर माझ्यातच आहे
माझा मोठा वैरी कोणी
हा शेर सर्वात आवडला..
चित्तरंजन भट
शुक्र, 10/04/2009 - 13:53
Permalink
ही
ही स्वरयमकाची गझल आहे ना?
हो. ही स्वरयमकांची रचना आहे.