माझी सावलीही रंगली...
कान्हा,पुरे,सारी पहा मी रंगली
माझी,अरे,बघ सावलीही रंगली!
मिळतात कोठे रंग हे गहिरे तुला?
आत्म्यासवे ज्यांनी तनू ही रंगली!
हे भाळ,ते आभाळ, झाले रे निळे
गोकुळ निळे,यमुना निळी ती रंगली!
ते सूर साती नादती प्राणातुनी
अन् बासरी 'अनुराग' रागी रंगली!
हा जन्म केवळ रंगण्या रासात ह्या!
एकेक राधा नर्तनी 'श्री'रंगली!
----------------------------------------------
(जयन्ता५२) होळीपौर्णिमा ०९
गझल: