मनात येता विचार त्याचा उदास होते हसले तरी
Posted by सोनाली जोशी on Friday, 17 April 2009कुठे छळाचा नसे पुरावा असे समंजस घर देखणे
सकाळ होता सजून बसते कमी अधिक घडले तरी
उजाड हा माळ अन् इथेही मला तुझ्या भेटतात हाका...
अजून रेंगाळतो तुझा हा सुगंध माझ्या सभोवताली
गझल
कुठे छळाचा नसे पुरावा असे समंजस घर देखणे
सकाळ होता सजून बसते कमी अधिक घडले तरी
चिरे लाव हे,.. तटांसारखे
शेर बांध अन,.. भटांसारखे!
अता सागरा, मिळून जावे,
जगावे किती,.. घटांसारखे?
रंग आपुले,..रंग विसरले?!
कसे भासती,.. छटांसारखे?
ह्वायचेय ना, तुला प्रवक्ता?
बोल बरे,.. पोपटांसारखे!
वाहतेस तू, समीप इतक्या;
तुला जाणतो,.. तटांसारखे!
कश्या वर्णु ह्या,.. ’कुंतल-क्रीडा’?
शब्द सांग ना,..’बटांसारखे’!
जगायचे ना?...लगेच लावा,
वृक्ष, निंब अन वटांसारखे!
भल्या माणसा, तुझे वागणे,
असो तिन्ही, मर्कटांसारखे!
शब्द, भाव हे, कसे ओळखू?
अता टाळतो मी, बोलणे कितीदा
कुणी ऐकते का ?..... सांगणे कितीदा
आज भटांचा जन्मदिन ! त्यांच्या चरणी ही गझल सादर अर्पण!!
...जायचे कुठे ?
वाटती दारे तिथे निघतात खिडक्या
जीवनाची मयसभा घेतेय फिरक्या
गवसता भासला, उजवा जणू
चिकटला तोच मग, जळवा जणू