गझल

गझल

ज्या मरणाला ...

आधी मजला एकटेच जे टाकुन गेले होते
नंतर माझी गझल पुन्हा ते घोकुन गेले होते

फक्त लपविले सत्य आणखी काही माझे शेर
नंतर आले सगळे आणिक ओकुन गेले होते

स्मशानावरी होती त्यांच्या एक मोकळी पाटी
नंतर माझे नाव तयावर ठोकुन गेले होते

पोथी घेऊन पुढ्यात जे जे संन्यासी म्हणविती
दुःखासोबत सुखही माझे भोगुन गेले होते

ज्या मरणाला घाबरते जग .. त्याचे ऐसे घडले
मला पाहता सरणावर ते वाकुन गेले होते

संतोष (कवितेतला)

गझल: 

रात्र आली....

रात्र आली चा॑दण्याना माळुनी
अन पुन्हा गेली जिवाला जाळुनी

देत आलो मी जगाला उत्तरे
प्रश्न माझा राहिला रे॑गाळुनी

यामुळे ना मा॑डला प्रस्ताव मी
वातले देशील तू फेटाळुनी

वर्शु दे पाऊस स्पर्शाचा तुझ्या
रात्र सारी जाउ दे ग॑धाळुनी

सौख्य ना आले कधी भेटावया
घेतले दुक्खास मी कवताळुनी

तू दग्याने प्राण माझा घेतला
मी दिला असता तुला ओवाळुनी

-वैभव देशमुख

गझल: 

आताशा तो जरा निराळे वागत असतो

अनेकवेळा तीच कहाणी सांगत असतो
लकब आणि आवाज जरासा बदलत असतो

गळून पडती पिकली पाने जमिनीवरती
हा तुझा चेहराही का तसा दिसत असतो?

गझल: 

Pages